
कोल्हापूर, 9 नोव्हेंबर (हिं.स.)रत्नागिरी डेरवण येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय शालेय शासकीय कबड्डी स्पर्धेत शिरोली हायस्कूल, शिरोली पुलाची या कोल्हापूर विभागीय संघाने प्रथम क्रमांक प्राप्त केला.सदर संघाने उपांत्य पूर्व सामन्यात छ.संभाजीनगर विभागीय संघाचा 63-21 ने पराभव करून उपांत्य सामन्यात प्रवेश केला. उपांत्य सामन्यात अमरावती विभागीय संघाचा 63-51 अशा फरकाने विजय मिळवत अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केला.
अंतिम सामन्यात लातूर विभागीय संघाचा 74-45 गुणांनी पराभव करून राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला.विजयी संघास संस्थेचे चेअरमन सुरेशराव पाटील,अध्यक्ष सलीम देसाई, सेक्रेटरी कृष्णात खवरे, संचालक श्रीकांत पाटील, शाळेचे मुख्याध्यापक एम.एस. स्वामी, पर्यवेक्षिका एस.एस.गाडेकर, जिमखाना प्रमुख आर.एस.पाटील, एन.आय. एस. कोच दीपक पाटील यांचे प्रोत्साहन लाभले. प्रशिक्षक नामदेव गावडे, संभाजी गावडे, कुबेर पाटील, सचिन कोळी, नितीन पदमाई यांचे मार्गदर्शन लाभले.* *आर.एम.मारापुरे यांनी संघ व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. खेळाडूंच्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.*
*यावेळी उपस्थित अधिकारी माननीय क्रीडा व युवक सेवा संचालनालय उपसंचालक सुहास पाटील रत्नागिरी जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे ,आंतरराष्ट्रीय खेळाडू गिरीश ईरनार, सायली केरीपाळे, ऋतुराज कोरवी, दिनेश चव्हाण
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar