ॲपल भारतात १५ डिसेंबरपासून ॲपल फिटनेसप्लस सेवा करणार सुरू
मुंबई, 10 डिसेंबर (हिं.स.)। ॲपलने आपली लोकप्रिय डिजिटल फिटनेस आणि वेलनेस सेवा ॲपल फिटनेस प्लस भारतात सुरू करण्याची घोषणा केली आहे. ही सेवा १५ डिसेंबरपासून भारतीय वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होणार आहे. कंपनीच्या आतापर्यंतच्या सर्वांत मोठ्या ग्लोबल विस्त
Apple Fitness+ service


मुंबई, 10 डिसेंबर (हिं.स.)। ॲपलने आपली लोकप्रिय डिजिटल फिटनेस आणि वेलनेस सेवा ॲपल फिटनेस प्लस भारतात सुरू करण्याची घोषणा केली आहे. ही सेवा १५ डिसेंबरपासून भारतीय वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होणार आहे. कंपनीच्या आतापर्यंतच्या सर्वांत मोठ्या ग्लोबल विस्तारामध्ये भारताचाही समावेश करण्यात आला असून, यामुळे भारतीय युजर्सना आता जागतिक दर्जाचा डिजिटल फिटनेस अनुभव मिळणार आहे.

ॲपलचे ॲपल फिटनेस प्लस केवळ वर्कआउट अ‍ॅप नसून हा एक संपूर्ण डिजिटल फिटनेस इकोसिस्टम आहे. ही सेवा Apple Watch, iPhone, iPad आणि Apple TV सोबत एकत्र काम करते. युजर्सना त्यांच्या फिटनेस जर्नीमध्ये वैयक्तिक मार्गदर्शन मिळते तसेच रिअल-टाइम हेल्थ डेटा ट्रॅक केला जातो. नवीन AirPods Pro 3 सह ऑन-स्क्रीन हेल्थ मेट्रिक्स दिसत असल्यामुळे संपूर्ण अनुभव अधिक स्मूथ आणि इंटरॲक्टिव्ह झाला आहे.

या सेवेमध्ये एकूण १२ प्रकारचे वर्कआउट फॉरमॅट्स देण्यात आले आहेत. स्ट्रेंथ ट्रेनिंग, योगा, HIIT, पिलाटेस, डान्स, सायकलिंग, किकबॉक्सिंग, मेडिटेशन, ट्रेडमिल रनिंग, रोइंग, कोअर एक्सरसाईज आणि माइंडफुल कूलडाउन अशा विविध प्रकारच्या वर्कआउट्सचा यात समावेश आहे. वर्कआउट सेशन्स ५ मिनिटांपासून ते ४५ मिनिटांपर्यंत निवडण्याची सुविधा देण्यात आली असून त्यामुळे नवशिक्यांपासून अनुभवी फिटनेस प्रेमींपर्यंत प्रत्येकाला आपल्या वेळेनुसार व्यायाम करता येणार आहे.

Apple Watch वापरणाऱ्या युजर्सना वर्कआउट करताना हार्ट रेट, कॅलरीज बर्न, ॲक्टिव्हिटी रिंग्स आणि बर्न बार यांसारखा रिअल टाइम डेटा थेट स्क्रीनवर पाहता येणार आहे. यामुळे वर्कआउट अधिक प्रभावीपणे ट्रॅक करता येईल. तसेच AirPods Pro 3 वापरकर्त्यांना देखील थेट हेल्थ मेट्रिक्सचा सपोर्ट मिळणार असल्याने फिटनेसचा अनुभव अधिक प्रगत होणार आहे.

या सेवेमधील एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ‘कस्टम प्लॅन्स’ फीचर. या माध्यमातून युजर्स त्यांच्या आवडीचे वर्कआउट, ट्रेनर, म्युझिक आणि कालावधी निवडून संपूर्ण आठवड्याचा वैयक्तिक फिटनेस प्लॅन तयार करू शकतात. रोज कोणता वर्कआउट करायचा याचा ताण या फीचरमुळे कमी होतो आणि नियमित व्यायामाची सवय लावणे अधिक सोपे होते.

म्युझिकच्या बाबतीतही Apple Music चे सखोल इंटिग्रेशन देण्यात आले आहे. वर्कआउट दरम्यान वापरकर्त्यांना त्यांच्या आवडीच्या गाण्यांवर व्यायाम करता येतो. यामध्ये आता K-Pop म्युझिक कॅटेगरीही जोडण्यात आली आहे. Artist Spotlight प्लेलिस्टमध्ये जागतिक कलाकारांच्या गाण्यांवर आधारित वर्कआउट्स देण्यात आले आहेत. तसेच ‘ऑडिओ वॉक’ अनुभवामध्ये सेलिब्रिटींच्या आयुष्याच्या कथा ऐकत चालण्याचा वेगळा आणि प्रेरणादायक पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.

सब्सक्रिप्शनच्या दृष्टीने भारतीय युजर्ससाठी दर अत्यंत परवडणारे ठेवण्यात आले आहेत. मासिक प्लॅन १४९ रुपयांमध्ये तर वार्षिक प्लॅन ९९९ रुपयांमध्ये उपलब्ध असेल. फॅमिली शेअरिंगमध्ये एकाच सब्सक्रिप्शनचा वापर ६ जणांपर्यंत करता येणार आहे. तसेच नवीन Apple Watch, iPhone, iPad, Apple TV किंवा AirPods Pro 3 खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ३ महिन्यांचे मोफत Apple Fitness+ सब्सक्रिप्शन दिले जाणार आहे.

ही सेवा iPhone 8 किंवा त्यानंतरच्या मॉडेल्स, Apple Watch Series 3 किंवा त्यापुढील मॉडेल्स, तसेच iPad आणि Apple TV वर वापरता येणार आहे. १५ डिसेंबरपासून ही सेवा अधिकृतपणे भारतात लाईव्ह होणार असून, त्यामुळे भारतीय युजर्स आता घरबसल्या जागतिक दर्जाचा फिटनेस अनुभव घेऊ शकणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande