गुगलने गॅलेक्सी एक्सआरसाठी अँड्रॉइड एक्सआर अपडेट आणि स्मार्ट ग्लासेस केला सादर
मुंबई, 10 डिसेंबर (हिं.स.)। गूगलने आयोजित केलेल्या ‘अँड्रॉइड शो एक्सआर एडिशन’ कार्यक्रमात एक्सटेंडेड रिअ‍ॅलिटी (एक्सआर) क्षेत्रातील आपल्या आगामी योजना आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाची झलक दिली. या कार्यक्रमात अँड्रॉइड एक्सआर साठी नव्या अपडेटला सुरुवात
Google Android XR


मुंबई, 10 डिसेंबर (हिं.स.)। गूगलने आयोजित केलेल्या ‘अँड्रॉइड शो एक्सआर एडिशन’ कार्यक्रमात एक्सटेंडेड रिअ‍ॅलिटी (एक्सआर) क्षेत्रातील आपल्या आगामी योजना आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाची झलक दिली. या कार्यक्रमात अँड्रॉइड एक्सआर साठी नव्या अपडेटला सुरुवात करण्यात आली असून सॅमसंग गॅलेक्सी एक्सआर सारख्या डिव्हाइसेससाठी अनेक नवे फिचर्स रोलआउट करण्यात आले आहेत.

या अपडेटमधील ‘पीसी कनेक्ट’ फिचरमुळे युजर्स आता आपला विंडोज संगणक थेट एक्सआर हेडसेटशी जोडू शकतात. यामुळे संपूर्ण डेस्कटॉप किंवा एखादी विशिष्ट विंडो हेडसेटमध्ये उघडता येणार आहे. विशेष बाब म्हणजे युजर्स पीसीच्या स्क्रीनसोबतचगुगल प्ले स्टोअर वरील नेटिव्ह अ‍ॅप्सही एकाच वेळी वापरू शकणार आहेत. सध्या हे फिचर बीटा टप्प्यात असून, याच्या माध्यमातून पीसी गेम्स खेळण्याची सुविधाही उपलब्ध होणार आहे.

‘Likeness’ हे आणखी एक महत्त्वाचे फिचर XR अनुभव अधिक वास्तवदर्शी बनवणारे आहे. या फिचरच्या मदतीने युजर्स आपला चेहरा डिजिटल स्वरूपात तयार करू शकतील. व्हिडीओ कॉलदरम्यान हे डिजिटल अवतार रिअल टाइममध्ये फेसियल एक्सप्रेशन्स आणि हँड जेस्चरची हुबेहूब नक्कल करेल. यामुळे व्हर्च्युअल मिटिंग्स अधिक नैसर्गिक आणि खऱ्यासारख्या वाटतील, असा दावा Google कडून करण्यात आला आहे.

Android XR मध्ये आता ‘Travel Mode’ देखील जोडला जाणार आहे. ट्रेन, फ्लाइट किंवा चालत्या वाहनात हेडसेट वापरताना हा मोड व्हिज्युअल्स स्थिर ठेवतो, त्यामुळे मोशन सिकनेसचा त्रास कमी होतो आणि VR अनुभव अधिक स्मूथ राहतो.

याशिवाय Google ने आपल्या AI स्मार्ट ग्लासेस संदर्भातील भविष्यातील योजना देखील जाहीर केल्या आहेत. कंपनी Warby Parker आणि Gentle Monster यांच्यासोबत भागीदारी करून नवीन स्मार्ट ग्लासेस विकसित करत आहे. हे ग्लासेस पुढील वर्षी लाँच होणार असून त्यात स्पीकर, कॅमेरा, मायक्रोफोनसह Google Gemini एआय असिस्टंट इनबिल्ट असेल.

या व्यतिरिक्त, लेन्समध्येच डिस्प्ले असलेले एआय ग्लासेसही विकसित केले जात आहेत. यामध्ये युजर्सला टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन तसेच लाइव्ह ट्रान्सलेशन थेट काचांमध्येच दिसेल. तसेच Android XR आता Wired XR ग्लासेसलाही सपोर्ट देणार आहे. याच अंतर्गत Project Aura नावाचे नवीन ग्लासेस येत असून यामध्ये 70 डिग्री फील्ड ऑफ व्ह्यू असेल. यासंबंधी अधिक तपशील कंपनी पुढील वर्षी शेअर करणार आहे. एकूणच, या अपडेट्समधून Google ने XR आणि AI आधारित वेअरेबल टेक्नॉलॉजीमध्ये मोठा बदल घडवण्याचा आपला संकल्प स्पष्ट केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande