
नाशिक, 10 डिसेंबर (हिं.स.) : - अन्न व औषध प्रशासनाच्या भरारी पथकाने जेलरोड परीसरात छापा टाकून लाखो रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांत एका विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या दक्षता व गुप्तवार्ता विभागामार्फत नाशिक विभागात प्रतिबंधित अन्न पदार्थ विक्री करणा-या विक्रेत्यांविरोधात धडक मोहिम हातात घेतली असून त्या नुसार विभागात ठिकठिकाणी धाडी घालण्यात आल्या आहेत जेल रोड, नाशिक येथे महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेले पानमसाला, सुगंधित तंबाखु यांसारखे अन्न पदार्थ मोठया प्रमाणावर साठवुन विक्री केली जात असल्याची माहिती नाशिक कार्यालयाचा गुप्तवाती विभागास मिळाली होती. पथकाने या ठिकाणी पाळत ठेवून दि 8 डिसेंबर रोजी नाशिकरोड घ्या जेल रोड परिसरात धाड टाकुन स. नं २६/ए, भावले चाळ मधील दुस-या क्रमांकाची खोली, साई कॉम्प्लेक्स, शिवाजीनगर, व हस्तकला हौसिंग सोसायटीमधील तळमजल्यावरील जिन्याजवळची खोली, परमजित सोसायटीसमोर, गोकुळ नगर, या दोन गोडावून ची तपासणी केली असता पथकास दोन्ही गोडावून मध्ये प्रतिबंधीत अन्नपदार्थाचा १९ लाख २० हजार ७७१ रूपयाचा साठा मिळून आला. हा साठा मालक जहांगीर अन्सार शेख ( वय ३८ वर्षे राहणार- १० धीरज अपार्टमेंट, ब्रम्हगिरी हौसिंग सोसायटी, भिमनगर, जेल रोड, ) याचा वापर करु नये म्हणून गोडावून सिल करण्यात आले आहे . जहांगीर अन्सार शेख याचे विरूध्द नाशिक रोड पोलिस ठाणे येथे भा.न्या.सं. कलम १२३ वगैरे अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. हि कारवाई , अन्न व औषध प्रशासना चे आयुक्त श्रीधर दुबे पाटील , सह आयुक्त (दक्षता) डॉ. राहुल खाडे यांचे मार्गदर्शनाखाली तसेच सह आयुक्त दिनेश तांबोळी, विश्वजीतः शिंदे, मनिष सानप यांचे नियंत्रणाखाली अन्न सुरक्षा अधिकारी गोविंदा गायकवाड़, किशोर चांदगुडे, संकेत येलमाने, अक्षय गाडेकर अविनाश दाभाडे, श्रीमती श्रध्दा राहिंज यांचे पथकाने ही कारवाई केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV