
जळगाव, 10 डिसेंबर (हिं.स.) वरणगाव परिसरातील सुशिलनगर भागात राहत्या घराचे कुलूप तोडून सुमारे ₹२ लाख ५५ हजार किमतीचे सोन्या–चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी सिद्धार्थ अशोक थाटे (वय २०, रा. सुशिलनगर, दर्यापूर शिवार, वरणगाव फॅक्टरी) यांनी दिलेल्या माहितीनुसार, घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. त्यानंतर दि. ९ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी घरी परतल्यावर मुख्य दरवाज्याचे कुलूप तुटलेले दिसले. घरात प्रवेश करून पाहिले असता, बेडरूममधील गोदरेज कपाटातील सर्व सामान अस्ताव्यस्त स्थितीत आढळले. चोरट्याने कपाटाचे लॉक फोडून त्यातील सर्व सोन्या–चांदीचे दागिने लंपास केले. चोरीस गेलेल्या दागिन्यांची किंमत एकूण ₹२,५५,००० इतकी असल्याचे फिर्यादीने सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार प्रतापसिंग बागुल करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर