नांदेड शहरात कार पंक्चर करून व्यापाऱ्याचे २९ लाख रुपये पळवले
नांदेड, 10 डिसेंबर (हिं.स.)। नांदेड शहरामध्ये कार पंक्चर करून व्यापाऱ्याचे २९ लाख रुपये पळवल्याची घटना घडली.जुना मोंढा रस्त्यावरील ही घटना घडली असून दुकानापासून १०० मीटर अंतरावर चोरी झाली आहे. जुना मोंढा परिसरात बॅग लिफ्टिंगची घटना घडली. तेलाच
नांदेड शहरात कार पंक्चर करून व्यापाऱ्याचे २९ लाख रुपये पळवले


नांदेड, 10 डिसेंबर (हिं.स.)।

नांदेड शहरामध्ये कार पंक्चर करून व्यापाऱ्याचे २९ लाख रुपये पळवल्याची घटना घडली.जुना मोंढा रस्त्यावरील ही घटना घडली असून दुकानापासून १०० मीटर अंतरावर चोरी झाली आहे.

जुना मोंढा परिसरात बॅग लिफ्टिंगची घटना घडली. तेलाचे व्यापारी विनायक पारसेवार कारने घरी जात होते. त्यांच्यासोबत सहकारी दत्ता कोचारे होते. दुकानापासून १०० मीटर अंतरावर गेल्यानंतर मोंढा रस्त्यावर कारचा टायर पंक्चर झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी कार थांबवली. दोघेही खाली उतरून हवा भरण्याचा पंप डिकीतून काढत होते. तेवढ्यात दुचाकीवरून आलेल्या दोघांनी कारमधील सीटवर ठेवलेली २९ लाख ६० हजारांची रोकड असलेलीबॅग पळवली. जुना मोंढा परिसरात ही घटना घडली. परिसरातील एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेरात चोरटे कैद झाले आहेत.

घटनेपूर्वी चोरट्यांनी व्यापाऱ्याची कार पंक्चर केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. कार पंक्चर झाल्याचे व्यापाऱ्याला थोड्या अंतरावर गेल्यानंतर लक्षात आले. त्यामुळे व्यापारी आणि त्यांचे सहकारी दोघे कारमधून उतरले. ही संधी चोरट्यांनी साधली. चोरट्यांनी हालचालींवर बारीक लक्ष ठेवले.

पारसेवार यांचा तेल विक्रीचा व्यवसाय असून जुना मोंढा भागात होलसेल दुकान आहे. दुकान बंद करुन घरी जाताना चोरी झाली. याप्रकरणी तपास सुरू करण्यात आला आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande