सिद्धेश्वर एक्स्प्रेसच्या एसी कोचमधून ५.५ कोटींचे दागिने चोरीला
सोलापूर, 10 डिसेंबर (हिं.स.)। मुंबईकडे जाणाऱ्या सिद्धेश्वर एक्स्प्रेस मध्ये मध्यरात्री एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. गोरेगाव (मुंबई) येथील एका सोन्या-चांदीच्या व्यापाऱ्याचे तब्बल ५ कोटी ५३ लाख रुपये (सुमारे ५ किलो) कि
railway


सोलापूर, 10 डिसेंबर (हिं.स.)। मुंबईकडे जाणाऱ्या सिद्धेश्वर एक्स्प्रेस मध्ये मध्यरात्री एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. गोरेगाव (मुंबई) येथील एका सोन्या-चांदीच्या व्यापाऱ्याचे तब्बल ५ कोटी ५३ लाख रुपये (सुमारे ५ किलो) किमतीचे सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने एसी कोचमधून चोरीला गेले आहेत.

विशेष म्हणजे, बर्थखाली चेन लावून सुरक्षित ठेवलेली बॅग तोडून चोरट्यांनी ही चोरी केली आहे. गोरेगावचे रहिवासी असलेले व्यापारी अभयकुमार जैन (वय ६०) हे सोलापूरहून आपल्या मुलीसह एसी कोच ए-१ मधून मुंबईला परतत होते. व्यवसायाच्या कामासाठी आणलेले सुमारे ४,४५६ ग्रॅम (४.४५६ किलो) वजनाचे मौल्यवान दागिने त्यांनी एका ट्रॉली बॅगमध्ये ठेवले होते. सुरक्षेसाठी ही बॅग त्यांनी सीटखाली चेनने लॉक केली होती. प्रवासादरम्यान रात्री त्यांना झोप लागली आणि पहाटे कल्याण स्टेशनजवळ पोहोचण्यापूर्वी त्यांना जाग आली. त्यांनी पाहिले असता, बर्थखाली लॉक केलेली बॅग जागेवरून गायब झाली होती. या घटनेने त्यांना मोठा धक्का बसला. जैन यांनी तातडीने रेल्वे कर्मचाऱ्यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande