
नाशिक, 10 डिसेंबर (हिं.स.)।फेरफार नोंदी साठी तब्बल दहा लाख रुपयांची लाच मागून अडीच लाख रुपये स्वीकारताना सिन्नर येथील नायब तहसीलदार संजय धनगर याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. सिन्नर येथे ही कारवाई करण्यात आली.
तक्रारदार यांची दोडी शिवारात जमीन असून, या जमिनीच्या फेर फार नोंदी चा निकाल तक्रार दार यांच्या बाजूने लावावा म्हणून दहा लाख रुपयांची लाच मागितली होती. मात्र अडीच लाख रुपयांवर तडजोड करण्यात आली. काल रात्री अडीच लाख रुपये स्वीकारताना पथकाने नायब तहसिलदार धनगर यांना रंगेहाथ पकडले. पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV