अमरावती: शिक्षिकेला डिजिटल अरेस्ट करत ९.४० लाखांनी लुटले
अमरावती, 10 डिसेंबर (हिं.स.)।शिक्षिकेला घरातच डिजिटल अरेस्ट करून तिला ९ लाख ४० लाखांनी लुटल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी शिक्षिकेच्या तक्रारीवरून सायबर पोलिसांनी गुन्हा नोंदवून चोरट्यांचा ऑनलाईन शोध सुरू केला आहे. खोलापुरीगेट ठाण्याच्य
शिक्षिकेला डिजिटल अरेस्ट, ९.४० लाखांनी लुटले


अमरावती, 10 डिसेंबर (हिं.स.)।शिक्षिकेला घरातच डिजिटल अरेस्ट करून तिला ९ लाख ४० लाखांनी लुटल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी शिक्षिकेच्या तक्रारीवरून सायबर पोलिसांनी गुन्हा नोंदवून चोरट्यांचा ऑनलाईन शोध सुरू केला आहे. खोलापुरीगेट ठाण्याच्या हद्दीत राहणा-या शिक्षिकेला २० नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास अनोळखी व्यक्तीने फोन करून दिल्ली गुन्हेशाखेतून बोलत असून तुमच्या नावाचे दिल्ली येथील बैंक ऑफ बडोदा शाखेत खाते आहे आणि या खात्यातून कोट्यवधी रुपयांचा आर्थिक व्यवहार झालेला आहे, अशी तक्रार आमच्याकडे आहे. तुम्हाला अटक करावी लागणार आहे. तुम्ही १० लाख रुपये दिले तर तुम्हाला अटक होणार नाही, असे सांगितले. घाबरलेल्या शिक्षिकेने जिल्हा मध्यवर्ती बँकेतून कर्ज घेतले आणि सायबर गुन्हेगाराने सांगितलेल्या बँक खात्यात ९ लाख ४० हजार रुपये जमा केले. त्यानंतर आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande