तिसऱ्या अ‍ॅशेस कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर; कमिन्स कर्णधारपदी परतला
कॅनबेरा, 10 डिसेंबर (हिं.स.)२०२५-२६ अ‍ॅशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर करण्यात आला आहे. पॅट कमिन्सने संघाच पुनरागमन केले आहे. आणि त्याच्याकडे पुन्हा एकदा कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पाठीच्या दुखापतीमुळे तो मागील द
पॅट कमिन्स


कॅनबेरा, 10 डिसेंबर (हिं.स.)२०२५-२६ अ‍ॅशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर करण्यात आला आहे. पॅट कमिन्सने संघाच पुनरागमन केले आहे. आणि त्याच्याकडे पुन्हा एकदा कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पाठीच्या दुखापतीमुळे तो मागील दोन कसोटी सामन्यांना मुकला होता. त्यानंतर स्टीव्ह स्मिथने जबाबदारी स्वीकारली होती. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमधील तिसरी कसोटी १७ डिसेंबरपासून अ‍ॅडलेड येथे होणार आहे. विजय मिळवल्यास ऑस्ट्रेलिया अ‍ॅशेस कायम राखणार आहे.

ब्रिस्बेन कसोटीत खेळलेल्या ऑस्ट्रेलियन संघात फक्त एकच बदल करण्यात आला आहे. कमिन्सचा संघात समावेश करण्याता आला आहे. अनुभवी फलंदाज उस्मान ख्वाजाने संघात आपले स्थान कायम ठेवले आहे. तो पहिल्या कसोटीत खेळला पण पाठीच्या दुखापतीमुळे तो सलामीला येऊ शकला नाही. दुसऱ्या कसोटीतून त्याला वगळण्यात आले, जिथे त्याच्या जागी जोश इंगलिसचा समावेश करण्यात आला, तर ट्रॅव्हिस हेड सलामीला आला होता. तिसऱ्या कसोटीतही अशीच परिस्थिती उद्भवू शकते असा अंदाज वर्तवला जात आहे. जर ख्वाजाने प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवले तर त्याला मधल्या फळीत स्थान मिळू शकते.

कमिन्स जुलैपासून क्रिकेट खेळलेला नाही. त्याने शेवटचा सामना जमैका येथे वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला होता. तिथेच वेगवान गोलंदाजाला पहिल्यांदा पाठीचा त्रास जाणवला होता. प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याचा समावेश केल्यास ऑस्ट्रेलियाला काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. जर ख्वाजा आणि फिरकी गोलंदाज नाथन लिऑन खेळले तर इंग्लिस, स्कॉट बोलँड आणि मायकेल नेसर/ब्रेंडन डॉगेट या तिघांनाही वगळावे लागेल. ब्रिस्बेनमधील पिंक बॉल टेस्टसाठी ऑस्ट्रेलियाने नेसरला खेळवले, तर लिऑनला बाहेर ठेवले जाण्याची शक्यता आहे.

तिसऱ्या अ‍ॅशेस टेस्टसाठी ऑस्ट्रेलियन संघ

पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, जेक वेदरल्ड, ट्रॅव्हिस हेड, स्कॉट बोलँड, अ‍ॅलेक्स केरी (यष्टीरक्षक), ब्रेंडन डॉगेट, जोश इंग्लिस, नाथन लिऑन, मायकेल नेसर, मिचेल स्टार्क, ब्यू वेबस्टर.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande