
मुंबई, 10 डिसेंबर, (हिं.स.)। न्यू इयर पार्टी सीझनला आणखी खास करण्यासाठी ‘राहु केतु’ चित्रपटाचे पहिले गाणे ‘मदिरा’ प्रदर्शित झाले आहे. प्रदर्शित होताच गाणं सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागले आहे. झी स्टुडिओज आणि बीलाइव्ह प्रोडक्शन्स यांनी चाहत्यांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम देत चित्रपटाचा टीझर सादर केला. या टीझरमधून चित्रपटाची मजेदार, कॉस्मिक आणि हटके दुनिया प्रेक्षकांसमोर उलगडली. टीझरनंतर लगेच प्रदर्शित झालेले ‘मदिरा’ हे गाणे पाहूनच हे स्पष्ट होते की यंदाच्या पार्टी सीझनचे नवे अँथम हेच गाणे ठरणार आहे.
गाण्यात अभिनेत्री शालिनी पांडे आपल्या बोल्ड, ग्लॅमरस आणि पूर्वी कधी न पाहिलेल्या स्टायलिश लूकसह प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. तिचे एनर्जेटिक आणि स्मूद डान्स मूव्ह्ज गाण्याची वाइब अधिक उच्चांकावर घेऊन जातात. तर पुलकित सम्राट आणि वरुण शर्मा यांची मजेदार केमिस्ट्री, शार्प कोरिओग्राफी आणि बिंदास अंदाज या पार्टी नंबरला पूर्ण धमाल बनवतात.
‘मदिरा’ या गाण्याचे संगीत विक्रम मॉन्ट्रोज यांनी दिले असून सिमर कौर, अभिनव शेखर आणि विक्रम मॉन्ट्रोज यांनी गीताला आपले स्वर दिले आहेत. गाण्याचे बोल अभिनव शेखर यांच्या लेखणीतून उतरले आहेत. या ट्रॅकबद्दल बोलताना विक्रम मॉन्ट्रोज यांनी सांगितले की, त्यांनी ‘राहु केतु’ची मस्ती, पागलपंती आणि बेधडक ऊर्जा अचूक पकडणारे गाणे तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. “फक्त मूडमध्ये या आणि क्षणाला जगा,” असे ते म्हणाले.
विपुल गर्ग दिग्दर्शित ‘राहु केतु’ चित्रपटाला झी स्टुडिओज प्रस्तुत करत असून निर्मिती झी स्टुडिओज आणि बीलाइव्ह प्रोडक्शन्सची आहे. ‘राहु केतु’ हा चित्रपट 16 जानेवारी 2026 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर