
रत्नागिरी, 11 डिसेंबर, (हिं. स.) : महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या उपाध्यक्षपदी रत्नागिरीचे ज्येष्ठ बुद्धिबळ मार्गदर्शक व रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष श्रीराम खरे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली.
राज्य संघटनेची निवडणूक प्रक्रिया जळगाव येथे झाली. निवडणूक सभेला संघटनेचे आधारस्तंभ अशोक जैन, निरीक्षक ए. के. रायजादा उपस्थित होते. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांचे प्रतिनिधी या सभेस उपस्थित होते.
नवीन कार्यकारिणी अशी - अध्यक्ष डॉ. परिणय फुके (गोंदिया), कार्याध्यक्ष सिद्धार्थ मयूर (जळगाव), मानद सरचिटणीस निरंजन गोडबोले (पुणे), खजिनदार भरत चौगुले (कोल्हापूर), उपाध्यक्ष सुनील रायसोनी (नागपूर), चिदंबर कोटीभास्कर (सांगली), श्रीराम खरे (रत्नागिरी), सहसचिव सतीश ठाकूर (जालना), डॉ. दीपक तांडेल (ठाणे), अश्विन मुसळे (चंद्रपूर), कार्यकारिणी सदस्य- जीएम अभिजित कुंटे, जीएम विदित गुजराथी, आयएम सौम्या स्वामीनाथन, डब्ल्यूजीएम स्वाती घाटे, नियुक्त सदस्य- राजेंद्र कोंडे (उपाध्यक्ष), अंकुश रक्ताडे (सहसचिव), रवींद्र धर्माधिकारी (सहसचिव).
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी