केंद्र सरकारने सिंहस्थाच्या रिंग रोडमध्ये केला बदल, शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार
नाशिक, 11 डिसेंबर (हिं.स.)। - सिंहस्थ कुंभ मेळ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नाशिक मधून जाणाऱ्या रिंग रोडला मान्यता देताना त्यामध्ये बदल केलेला आहे तर हा रिंग रोड थेट वाढवण बंदराच्या रस्त्याला जोडण्यात आला आहे त्यामुळे अधिक जलद गतीने वाह
केंद्र सरकारने सिंहस्थाच्या रिंग रोडमध्ये केला बदल, शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार


नाशिक, 11 डिसेंबर (हिं.स.)।

- सिंहस्थ कुंभ मेळ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नाशिक मधून जाणाऱ्या रिंग रोडला मान्यता देताना त्यामध्ये बदल केलेला आहे तर हा रिंग रोड थेट वाढवण बंदराच्या रस्त्याला जोडण्यात आला आहे त्यामुळे अधिक जलद गतीने वाहतूक व्यवस्था होणार आहे. केंद्र सरकारने राज्य सरकारच्या मान्यतेमध्ये बदल केल्याचे स्पष्ट झाले आहे लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे.

नासिक मध्ये होत असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नासिक शहराच्या लगत असलेल्या 77 किलोमीटर लांबीचा रिंग रोड तयार केलेला होता त्याला मान्यता दिली होती आणि याबाबत केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने मान्यता दिल्यानंतर याबाबतची मान्यता केंद्रीय रस्ते मंत्रालयाकडून मिळणार होती. त्यासाठी म्हणून रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे व्ही. उमाशंकर, सचिव अध्यक्षस्थानी होते . बैठकीत विनय कुमार, एएस (हायवे), मनोज कुमार, सीई (बीपी अँड एसपी,) प्रशांत जे. फेगडे, सीई आणि आरओ, मुंबई (व्हीसी द्वारे) भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंशुमाली श्रीवास्तव, आरओ मुंबईतील महाराष्ट्र राज्य सरकारचे व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे. प्रवीण गेडाम, विभागीय आयुक्त, शेखर सिंग, आयुक्त कुंभमेळा, नाशिक . आयुष प्रसाद, नाशिकचे जिल्हाधिकारी. ब्रिजेश दीक्षित, एमडी, एमएसआयडीसी, रणजीत आर. हांडे. सीई, एमएसआयडीसी प्रमोद बं गोसावी, एसई, एमएसआयडीसी आधी उपस्थित होते.

या अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या राज्य सरकारने मान्यता दिलेल्या 77 किलोमीटर लांबीच्या रस्त्यापैकी 47. 90 किलोमीटरच्या रिंग रोडला मान्यता दिलेली आहे हा रिंग रोड तयार करताना एक लहरा आणि देवळाली छावणी हा देशाच्या सुरक्षेतेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असलेला परिसर वगळण्यात आलेला आहे.

हा रस्ता तयार करण्यासाठी म्हणून पाच हजार आठशे पाच कोटी रुपये खर्च अपेक्षित असून यामुळे नाशिक शहरातील वाहतुक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे नाशिक शहरा लगत असलेल्या 18 गावांमधील 305 एकर जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे तर या मार्गावरती 29 ठिकाणी भुयारी मार्ग उभारण्यात येणार आहे. यावर सुमारे 18 छोटे पूल आहेत तर तीन मोठे रिंग रोड संपर्कात येणार आहे चौपदरी आणि सहा पदरी अशा स्वरूपाचा हा महामार्ग असणारा असून ताशी 100 किलोमीटर वेगाने या महामार्गावरून वाहने धावू शकणार आहे अशा स्वरूपाची या नवीन रिंग रोड ची वैशिष्ट्ये असल्याचे बैठकीनंतर अधिकाऱ्यांनी सांगितले.

हा रिंग रोड आडगाव टर्मिनल पासून सुरु होणार असून पुढे दिंडोरी रोड पेठ रोड ओलांडून गंगापूर गाव मार्गे पिंपळगाव बहुला त्रंबक रोड येथून थेट मुंबई आग्रा महामार्गावरील रायगड नगर या ठिकाणी निघणार आहे तिथून हा रस्ता जवळच असलेल्या गोंदे दुमाले येथून वाढवण बंदराच्या महामार्गाला जोडला जाणार आहे तर आडगाव टर्मिनस येथून चेन्नई महामार्गाला देखील हा रस्ता जोडला जाणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande