
पुणे, 14 डिसेंबर (हिं.स.)सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२५ चा ग्रुप बी चा एक रोमांचक सामना पुण्यातील डीवाय पाटील अकादमी येथे मुंबई आणि हरियाणा यांच्यात खेळवण्यात आला. मुंबईचे प्रतिनिधित्व करणारा यशस्वी जयस्वाल जबरदस्त फॉर्ममध्ये होता. त्याच्या प्रभावी फलंदाजीच्या कामगिरीचा अंदाज त्याने डावाची सुरुवात करताना एकूण ५० चेंडूंचा सामना केला यावरून लावता येतो. त्याने २०२.०० च्या स्ट्राईक रेटने १०१ धावा केल्या. यशस्वीने आपल्या शतकी खेळीत १६ चौकार आणि १ षटकार मारला आणि त्याला सामनावीराचा पुरस्कारानेही गौरवण्यात आले.
यशस्वीच्या स्फोटक खेळीमुळे मुंबईच्या संघाने ४ विकेट्सने या सामन्याक विजय मिळवला. हरियाणाच्या संघाने ठेवलेल्या २३५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना यशस्वीने झंझावती १०१ धावांची खेळी केली. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज सरफराज खानने २५ चेंडूत ६४ धावा केल्या, तर अजिंक्य रहाणेने १० चेंडूत २१ धावा केल्या.
हरियाणाकडून सामंत जाखर सर्वात यशस्वी गोलंदाज या सामन्यात ठरला. त्याने ३.३ षटकांत ४२ धावा देत दोन विकेट्स घेतल्या. अंशुल कंबोज, इशांत भारद्वाज, सुमित कुमार आणि अमित राणा यांनी प्रत्येकी एकेक विकेट घेतली.
तत्पूर्वी, पुण्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केल्यानंतर, हरियाणाने २० षटकांत तीन विकेट्स गमावून २३४ धावा केल्या. कर्णधार अंकित कुमारने सर्वाधिक धावा केल्या, त्याने डावाची सुरुवात करुन ४२ चेंडूत २११.९० च्या स्ट्राईक रेटने ८९ धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या निशांत सिंधूने ३८ चेंडूत नाबाद ६३ धावांचे योगदान दिले. पण त्यांच्या या खेळी हरियाणाला विजय साकरुन देऊ शकल्या नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे