जिओकडून तीन नवे प्रीपेड प्लॅन लाँच
मुंबई, 15 डिसेंबर (हिं.स.)। नवीन वर्ष २०२६च्या आधीच रिलायन्स जिओने आपल्या कोट्यवधी ग्राहकांसाठी खास भेट जाहीर केली आहे. कंपनीने ‘Happy New Year 2026’ या नावाखाली तीन नवे प्रीपेड रिचार्ज प्लॅन लाँच केले असून, या प्लॅनमध्ये कनेक्टिव्हिटीसोबतच एंटरटेन
Jio


मुंबई, 15 डिसेंबर (हिं.स.)। नवीन वर्ष २०२६च्या आधीच रिलायन्स जिओने आपल्या कोट्यवधी ग्राहकांसाठी खास भेट जाहीर केली आहे. कंपनीने ‘Happy New Year 2026’ या नावाखाली तीन नवे प्रीपेड रिचार्ज प्लॅन लाँच केले असून, या प्लॅनमध्ये कनेक्टिव्हिटीसोबतच एंटरटेनमेंट आणि डिजिटल सेवांचा समावेश करण्यात आला आहे. विविध प्रकारच्या वापरकर्त्यांच्या गरजा लक्षात घेऊन हे प्लॅन डिझाइन करण्यात आले आहेत.

जिओचा पहिला प्लॅन हा वार्षिक स्वरूपाचा असून ‘Jio Hero Annual Recharge Plan’ या नावाने तो सादर करण्यात आला आहे. या प्लॅनची किंमत ३,५९९ रुपये असून त्यामध्ये तब्बल ३६५ दिवसांची वैधता मिळते. या प्लॅनमध्ये दररोज २.५ जीबी डेटा, अनलिमिटेड ५जी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा देण्यात आली आहे. याशिवाय या रिचार्जमध्ये १८ महिन्यांचे Google Gemini Pro चे सब्सक्रिप्शन पूर्णपणे मोफत देण्यात येत असून, कंपनीनुसार त्याची किंमत ३५,१०० रुपये आहे. वर्षभर रिचार्जची चिंता नको असलेल्या ग्राहकांसाठी हा प्लॅन आकर्षक ठरणार आहे.

दुसरा प्लॅन हा मासिक स्वरूपाचा असून ‘Super Celebration Monthly Plan’ या नावाने तो उपलब्ध करून देण्यात आला आहे. या प्लॅनची किंमत ५०० रुपये असून त्यामध्ये २८ दिवसांची वैधता मिळते. ग्राहकांना दररोज २ जीबी डेटा, अनलिमिटेड ५जी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएसची सुविधा या प्लॅनमध्ये देण्यात आली आहे. या प्लॅनचे खास आकर्षण म्हणजे त्यामध्ये मिळणारे मोठे OTT बंडल. या अंतर्गत YouTube Premium, JioHotstar, Amazon Prime Video, Sony LIV, ZEE5, Lionsgate Play, Discovery+, Sun NXT, Kancha Lanka, Planet Marathi, Chaupal, FanCode आणि Hoichoi यांसारख्या लोकप्रिय प्लॅटफॉर्म्सचे मोफत सब्सक्रिप्शन देण्यात येत आहे. या प्लॅनमध्येही १८ महिन्यांचे Google Gemini Pro सब्सक्रिप्शन समाविष्ट आहे.

तिसरा प्लॅन हा कमी बजेटमधील वापरकर्त्यांसाठी सादर करण्यात आला असून ‘Jio Flexi Pack’ असे त्याचे नाव आहे. या प्लॅनची किंमत फक्त १०३ रुपये असून त्यामध्ये २८ दिवसांची वैधता मिळते. या प्लॅनमध्ये ग्राहकांना ५ जीबी डेटा दिला जातो. विशेष बाब म्हणजे या प्लॅनमध्ये ग्राहकांना आपल्या पसंतीनुसार एंटरटेनमेंट पॅक निवडण्याची मुभा देण्यात आली आहे. हिंदी पॅकमध्ये JioHotstar, ZEE5 आणि Sony LIV, इंटरनॅशनल पॅकमध्ये JioHotstar, FanCode, Lionsgate आणि Discovery+, तर रिजनल पॅकमध्ये JioHotstar, Sun NXT, Kancha Lanka आणि Hoichoi यांचा समावेश आहे.

नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर जिओने सादर केलेले हे तीनही प्रीपेड प्लॅन कनेक्टिव्हिटी, एंटरटेनमेंट आणि डिजिटल सेवांचा उत्तम मेळ साधणारे ठरत असून, विविध बजेट आणि गरजांनुसार ग्राहकांसाठी हे प्लॅन उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande