किया सेल्टोसचे सेकंड-जेनरेशन केले सादर
मुंबई, 15 डिसेंबर (हिं.स.)। किया इंडियाने आपल्या लोकप्रिय मिड-साइज एसयूव्ही किया सेल्टोसचा सेकंड-जेनरेशन अवतार अधिकृतपणे सादर केला आहे. भारतात 2019 मध्ये पहिल्यांदा लाँच झालेली किया सेल्टोस ही कंपनीची पहिली कार होती आणि गेल्या सहा वर्षांत ती किया स
Kia Seltos India


Kia Seltos India


मुंबई, 15 डिसेंबर (हिं.स.)। किया इंडियाने आपल्या लोकप्रिय मिड-साइज एसयूव्ही किया सेल्टोसचा सेकंड-जेनरेशन अवतार अधिकृतपणे सादर केला आहे. भारतात 2019 मध्ये पहिल्यांदा लाँच झालेली किया सेल्टोस ही कंपनीची पहिली कार होती आणि गेल्या सहा वर्षांत ती किया साठी मजबूत ब्रँड-बिल्डर ठरली आहे. त्यामुळेच कियाने नव्या पिढीची सेल्टोस भारतातच ग्लोबली लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या मॉडेलची अधिकृत किंमत २ जानेवारी २०२६ रोजी जाहीर केली जाणार असून, बुकिंग ११ डिसेंबरपासून २५ हजार रुपयांच्या टोकन रकमेसह सुरू होणार आहे. डिलिव्हरी जानेवारीच्या मध्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे.

सेकंड-जेनरेशन Kia Seltos मध्ये पूर्णपणे बदललेले एक्सटीरियर आणि इंटीरियर पाहायला मिळते, मात्र मेकॅनिकलदृष्ट्या ही SUV मागील मॉडेलसारखीच आहे. डिझाइनच्या बाबतीत पुढील बाजूस Kia Telluride पासून प्रेरित आक्रमक लुक देण्यात आला आहे. नव्या ग्रिलमध्ये वर्टिकल गन-मेटल एक्सेंट, चौकोनी LED हेडलॅम्प्स आणि आकर्षक डेटाइम रनिंग लॅम्प सिग्नेचर देण्यात आले आहे. बंपरवर ब्लॅक क्लॅडिंग आणि बॉडी-कलर एक्सेंट्स SUV ला अधिक दमदार लुक देतात. साइड प्रोफाइलमध्ये शार्प कॅरेक्टर लाइन्स, फ्लश-फिटिंग डोअर हँडल्स आणि मागील बाजूस रॅपअराउंड इफेक्ट देणारा ब्लॅक ट्रिम दिसतो. मागे उलट्या L-आकाराचे LED टेललॅम्प्स, रूफ स्पॉइलर आणि नवीन 18-इंच अलॉय व्हील्स ही या गाडीची खास ओळख ठरते. याशिवाय, नवीन Seltos आधीच्या मॉडेलपेक्षा मोठी असून व्हीलबेस 80 मिमीने वाढवण्यात आला आहे, ज्याचा थेट फायदा इंटीरियर स्पेसला झाला आहे.

इंटीरियरकडे पाहिल्यास, केबिन पूर्णपणे नव्याने डिझाइन करण्यात आला आहे. पॅनोरमिक डिस्प्लेमध्ये 12.3-इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट, 12.3-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि 5-इंच HVAC डिस्प्ले देण्यात आला आहे. नवीन तीन-स्पोक स्टीयरिंग व्हील, ड्राइव्ह व ट्रॅक्शन मोड बटन्स, एम्बियंट लाइटिंग आणि सॉफ्ट-टच लेदरेट मटेरियलमुळे केबिन अधिक प्रीमियम वाटतो. वापरण्यास सोपे बटन्स, डायल्स आणि नॉब्स ठेवण्यात आल्याने ड्रायव्हिंगदरम्यान सोय राखण्यात आली आहे.

फीचर्सच्या बाबतीत, टॉप वेरिएंटमध्ये व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, पॅनोरमिक सनरूफ, वायरलेस चार्जर, वायरलेस Apple CarPlay आणि Android Auto, मेमरी फंक्शनसह पावर्ड ड्रायव्हर सीट, 360-डिग्री कॅमेरा, 64-कलर एम्बियंट लाइटिंग आणि Bose साउंड सिस्टीम देण्यात आली आहे. यासोबतच OTA अपडेट्स, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी आणि लेव्हल-2 ADAS सुइटदेखील मिळते. सेफ्टीसाठी 6 एअरबॅग्स, ESC, ऑल-व्हील डिस्क ब्रेक्स, हिल-स्टार्ट असिस्ट, TPMS, ISOFIX अँकरेज आणि रिअर कॅमेरा हे फीचर्स स्टँडर्ड देण्यात आले आहेत.

पावरट्रेनच्या बाबतीत, नव्या Kia Seltos मध्ये पूर्वीचेच तीन इंजिन पर्याय कायम ठेवण्यात आले आहेत. 1.5-लिटर नॅचरल अस्पिरेटेड पेट्रोल, 1.5-लिटर टर्बो-पेट्रोल आणि 1.5-लिटर डिझेल इंजिन हे पर्याय उपलब्ध असतील, ज्यांना मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचे विविध पर्याय मिळतात. ट्रिम्सबाबत बोलायचे झाल्यास, Tech Line, GT Line आणि X-Line असे पर्याय असतील, ज्यामध्ये डिझाइन आणि फीचर्समध्ये थोडेफार बदल असतील.

एकूणच, अधिक आकर्षक डिझाइन, प्रीमियम इंटीरियर आणि आधुनिक फीचर्ससह येणारी सेकंड-जेनरेशन Kia Seltos २ जानेवारीला लाँच झाल्यानंतर Hyundai Creta, Honda Elevate, Maruti Grand Vitara आणि Tata Sierra यांसारख्या SUVना थेट टक्कर देणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande