मोटोरोला एज 70 स्मार्टफोन झाला भारतात लाँच
मुंबई, 15 डिसेंबर (हिं.स.)। मोटोरोलाने भारतीय बाजारात आपला नवा स्मार्टफोन मोटोरोला एज 70 अधिकृतपणे लॉन्च केला आहे. मिड-रेंज सेगमेंटमध्ये आलेल्या या फोनमध्ये क्वालकॉमचा लेटेस्ट स्नॅपड्रॅगन ७ जेन 4 प्रोसेसर देण्यात आला असून परफॉर्मन्स आणि फीचर्सच्या
Motorola Edge 70


Motorola Edge 70


मुंबई, 15 डिसेंबर (हिं.स.)। मोटोरोलाने भारतीय बाजारात आपला नवा स्मार्टफोन मोटोरोला एज 70 अधिकृतपणे लॉन्च केला आहे. मिड-रेंज सेगमेंटमध्ये आलेल्या या फोनमध्ये क्वालकॉमचा लेटेस्ट स्नॅपड्रॅगन ७ जेन 4 प्रोसेसर देण्यात आला असून परफॉर्मन्स आणि फीचर्सच्या बाबतीत हा फोन लक्षवेधी ठरत आहे. मोटोरोला एज 70 मध्ये 5000mAh क्षमतेची सिलिकन कार्बन बॅटरी देण्यात आली असून ती 68W वायर्ड आणि 15W वायरलेस फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

मोटोरोला एज 70 ची भारतातील किंमत 29,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. लॉन्च ऑफरअंतर्गत निवडक बँक कार्डवर 1000 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. ग्राहक हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट, मोटोरोला इंडियाच्या अधिकृत वेबसाइटसह कंपनीच्या पार्टनर रिटेल स्टोअर्समधून खरेदी करू शकतात. हा फोन Pantone Bronze Green, Pantone Gadget Grey आणि Pantone Lily Pad अशा तीन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे.

डिस्प्लेबाबत बोलायचे झाले तर मोटोरोला एज 70 मध्ये 6.7 इंचाचा 1.5K AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट, 4500 निट्स पीक ब्राइटनेस, Gorilla Glass 7i प्रोटेक्शन तसेच Dolby Vision आणि HDR10+ सपोर्टसह येतो. त्यामुळे व्हिडीओ स्ट्रीमिंग आणि गेमिंगचा अनुभव अधिक स्मूथ मिळतो.

या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन ७ जेन 4 चिपसेटसोबत 8GB LPDDR5x RAM आणि 256GB UFS 3.1 स्टोरेज देण्यात आली आहे. सॉफ्टवेअरच्या बाबतीत हा फोन Android 16 आधारित Hello UI वर चालतो. कंपनीने या फोनसाठी 3 मोठे Android अपडेट्स आणि 4 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स देण्याचे आश्वासन दिले आहे. याशिवाय Moto AI टूल्स, Next Move, Catch Me Up 2.0, Pay Attention 2.0, Remember This + Recall आणि Co-pilot सारखी AI फीचर्सही देण्यात आली आहेत.

फोटोग्राफीसाठी मोटोरोला एज 70 मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये OIS सपोर्टसह 50MP प्रायमरी कॅमेरा, 50MP अल्ट्रावाइड कॅमेरा आणि थ्री-इन-वन लाइट सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी 50MP फ्रंट कॅमेरा मिळतो. हा फोन 4K रिझोल्यूशनमध्ये 60fps व्हिडीओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो. तसेच AI Video Enhancement, AI Action Shot आणि AI Photo Enhancement सारखी फीचर्स देण्यात आली आहेत.

बॅटरीच्या बाबतीत हा फोन सिंगल चार्जमध्ये सुमारे 31 तासांचा व्हिडीओ प्लेबॅक देतो, असा कंपनीचा दावा आहे. सुरक्षिततेसाठी आणि टिकाऊपणासाठी मोटोरोला एज 70 ला IP68 आणि IP69 रेटिंगसह MIL-STD-810H मिलिटरी ग्रेड ड्युरॅबिलिटी देण्यात आली आहे. यासोबतच हा फोन एअरक्राफ्ट-ग्रेड अ‍ॅल्युमिनियम फ्रेमसह येतो. एकूणच, दमदार प्रोसेसर, प्रीमियम डिझाइन आणि आधुनिक फीचर्समुळे मोटोरोला एज 70 मिड-रेंज स्मार्टफोन बाजारात मजबूत पर्याय ठरू शकतो.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande