मेळघाटातील प्रत्येक गावातून आलेल्या आदिवासी बांधवांची झाली ऐतिहासिक 'संसदवारी'
अमरावती, 16 डिसेंबर (हिं.स.)। ज्यांनी आजवर आपल्या गावाची वेस कधी ओलांडली नाही, अशा संपूर्ण मेळघाटातील कानाकोपऱ्यातून आणि प्रत्येक गावातून आलेल्या आदिवासी बांधवांनी थेट देशाची राजधानी गाठून ऐतिहासिक संसद भवनाला भेट दिली. अमरावतीचे खासदार बळवंतराव वा
मेळघाटातील प्रत्येक गावातून आलेल्या आदिवासी बांधवांची झाली ऐतिहासिक 'संसदवारी';


मेळघाटातील प्रत्येक गावातून आलेल्या आदिवासी बांधवांची झाली ऐतिहासिक 'संसदवारी';


अमरावती, 16 डिसेंबर (हिं.स.)। ज्यांनी आजवर आपल्या गावाची वेस कधी ओलांडली नाही, अशा संपूर्ण मेळघाटातील कानाकोपऱ्यातून आणि प्रत्येक गावातून आलेल्या आदिवासी बांधवांनी थेट देशाची राजधानी गाठून ऐतिहासिक संसद भवनाला भेट दिली. अमरावतीचे खासदार बळवंतराव वानखडे आणि माजी मंत्री व आमदार ॲड. यशोमतीताई ठाकूर यांच्या अभिनव संकल्पनेतून मेळघाटातील या बांधवांचे 'संसद दर्शन' घडले. विशेष म्हणजे या दौऱ्यात मेळघाटातील प्रत्येक गावाचे प्रतिनिधित्व होते. या अविस्मरणीय सहलीमुळे मेळघाटातील आदिवासी बांधव भारावून गेले असून, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राबवलेला हा उपक्रम कौतुकाचा विषय ठरला आहे.

अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हा निसर्गरम्य असला तरी अतिशय दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो. येथील अनेक नागरिक आजही बाहेरील जगापासून अलिप्त आहेत. अशा परिस्थितीत या बांधवांना देशाच्या लोकशाहीचे मंदिर पाहता यावे आणि जगाशी त्यांचा संपर्क वाढावा, यासाठी खासदार बळवंतराव वानखडे यांनी विशेष पुढाकार घेतला. त्यांच्या या प्रयत्नांमुळे मेळघाटातील प्रत्येक गावातील नागरिक थेट नवी दिल्लीतील संसद भवनात पोहोचले.

प्रियंका गांधींशी अनौपचारिक संवाद

या विशेष दौऱ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे, काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस तथा खासदार प्रियंकाजी गांधी आणि संघटन सरचिटणीस खासदार के.सी. वेणुगोपाल यांच्याशी झालेली भेट. खासदार वानखडे यांनी या बड्या नेत्यांशी आदिवासी बांधवांची प्रत्यक्ष भेट घडवून आणली. यावेळी आदिवासी बांधवांनी आपले गाऱ्हाणे आणि प्रेम या नेत्यांसमोर व्यक्त केले. इतक्या मोठ्या नेत्यांना समोर पाहून आणि भव्य संसद भवन पाहून उपस्थितांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान पाहायला मिळाले.

*सांघिक प्रयत्नातून संकल्पना पूर्ण*

ही संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी राज्याच्या माजी पालकमंत्री तथा आमदार ॲड. यशोमतीताई ठाकूर, काँग्रेसचे अमरावती ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबलूभाऊ देशमुख आणि चिखलदरा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. हा उपक्रम केवळ एक सहल नसून, दुर्गम भागातील जनतेला देशाच्या सर्वोच्च सभागृहाची ओळख करून देणारा एक 'सामाजिक पूल' ठरला आहे.

मान्यवरांची उपस्थितीया ऐतिहासिक दिल्ली दौऱ्यात आणि संसद भेटीदरम्यान खासदार बळवंतराव वानखडे यांच्यासह माजी जि.प. सभापती दयारामजी काळे, चिखलदरा काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष सहदेव बेलकर, धारणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती राहुल येवले, चिखलदरा अनु. जाती काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मेहपतसिंग उईके, संजयभाऊ बेलकर, राजेशभाऊ सेमलकर, मेळघाट विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष पियुष मालवीय, नानकराम ठाकरे, तोताराम कास्देकर, सोनाजी कास्देकर, शिकारी बेठेकर, तसेच चिखलदरा काँग्रेस कमिटीचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande