
जळगाव, 16 डिसेंबर, (हिं.स.) - जळगावच्या बोदवड नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अखेरच्या क्षणापर्यंत शिंदे सेनेच्या उमेदवाराचे दोन अर्ज वैध राहिल्याने बोदवड नगरपंचायतीवर पुन्हा एकदा शिंदे सेनेची सत्ता निश्चित झाली आहे. मीराबाई दिनेश माळी यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
मीराबाई माळी या पुढील एक वर्षांसाठी बोदवड नगरपंचायतीचे नेतृत्व करतील.बोदवड नगरपंचायतीवर गेल्या चार वर्षांपासून शिवसेना (शिंदे गट) चे आनंदा पाटील हे नगराध्यक्षपदाची धुरा यशस्वीरीत्या सांभाळत होते. स्थानिक पातळीवर निश्चित झालेल्या धोरणानुसार त्यांनी आपल्या नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे रिक्त झालेल्या नगराध्यक्षपदासाठी आज (१६ डिसेंबर) निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी प्रक्रिया राबवली.या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी शिवसेना (शिंदे गट) मधील मीराबाई माळी यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला. नगरपंचायतीमध्ये विरोधकांनी माळी यांच्या विरोधात अर्ज न भरल्यामुळे त्यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. या निवडणुकीचा अधिकृत निकाल २२ तारखेला जाहीर होणार असला, तरी बिनविरोध स्थितीमुळे बोदवड नगरपंचायतीवर शिंदे सेनेचाच नगराध्यक्ष विराजमान होणार हे स्पष्ट झाले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर