भुसावळमार्गे अजमेर करिता स्पेशल ट्रेन
जळगाव, 16 डिसेंबर (हिं.स.)अजमेरच्या ख्वाजा गरीब नवाज यांच्या उरुससाठी जाणाऱ्या भाविकांसाठी खूशखबर आहे. दक्षिण मध्य रेल्वेने मच्छलीपट्टणम ते अजमेर दरम्यान विशेष ट्रेन सुरु केली असून या गाडीला भुसावळ रेल्वे स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. यामुळे प्
भुसावळमार्गे अजमेर करिता स्पेशल ट्रेन


जळगाव, 16 डिसेंबर (हिं.स.)अजमेरच्या ख्वाजा गरीब नवाज यांच्या उरुससाठी जाणाऱ्या भाविकांसाठी खूशखबर आहे. दक्षिण मध्य रेल्वेने मच्छलीपट्टणम ते अजमेर दरम्यान विशेष ट्रेन सुरु केली असून या गाडीला भुसावळ रेल्वे स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांची सोय होणार आहे.

मछलीपट्टणम–अजमेर (07274) ही विशेष रेल्वे रविवारी, २१ डिसेंबर रोजी मछलीपट्टणम येथून सकाळी १० वाजता सुटणार असून ती दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५ वाजून ५ मिनिटाने भुसावळ स्थानकात दाखल होईल. यानंतर ती २३ डिसेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता अजमेर येथे पोहोचणार आहे.परतीच्या प्रवासासाठी अजमेर–मछलीपट्टणम (07275) ही विशेष गाडी सोमवार, २८ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता अजमेरहून रवाना होईल. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी ५ वाजून ५० मिनिटाने भुसावळ स्थानकावर येणार आहे. यानंतर तिसऱ्या दिवशी ३० डिसेंबर रोजी सकाळी ९. ३० मिनिटाने मछलीपट्टणमला पोहोचेल. गुडीवाडा, विजयवाडा, खम्मम, दोरनाकल, महबूबाबाद, वारंगल, जम्मीकुंटा, पेड्डापल्ली, करीमनगर, लिंगमपेट जगत्याल, मोर्तड, अरमुर, निजामाबाद, बसर, धर्माबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, परभणी, मनवाथ रोड, सेलू, परतूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, लासूर, रोटेगाव, नगरसोल, मनमाड, भुसावळ, खांडवा, इटारसी, भोपाळ, उज्जैन, रतलाम, मंदसोर, निमच, चित्तौडगड, भिलवाडा, बिजाईनगर आणि नशिराबाद या स्थानकांवर दोन्ही दिशेनं थांबणार.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande