विविध सामाजिक-धार्मिक कार्यक्रमांतून साजरा होणार आमदार किशोर जोरगेवार यांचा वाढदिवस
चंद्रपूर, 16 डिसेंबर (हिं.स.)। उद्या बुधवारी आमदार किशोर जोरगेवार यांचा वाढदिवस विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा केला जाणार आहे. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांना शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या शुभेच्छुकांनी गुलदस्त्यांऐवजी प
विविध सामाजिक-धार्मिक कार्यक्रमांतून साजरा होणार आमदार किशोर जोरगेवार यांचा वाढदिवस


चंद्रपूर, 16 डिसेंबर (हिं.स.)।

उद्या बुधवारी आमदार किशोर जोरगेवार यांचा वाढदिवस विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा केला जाणार आहे. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांना शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या शुभेच्छुकांनी गुलदस्त्यांऐवजी पुस्तके आणावीत, असे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

उद्या बुधवारी चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. यानिमित्त 28 ठिकाणी महाआरती, चार ठिकाणी बुद्धवंदना, पाच ठिकाणी भजन-कीर्तन, 14 आरोग्य शिबिरे, दोन ठिकाणी योग शिबिरे, आठ ठिकाणी अन्नदान कार्यक्रम, दहा ठिकाणी फळ वाटप, 12 ठिकाणी शैक्षणिक साहित्य वाटप, पाच ठिकाणी गरजूंना वस्त्र वाटप, दोन ठिकाणी धान्य वाटप, रोजगार मेळावा, तीन ठिकाणी सामाजिक सन्मान सोहळा, चार ठिकाणी रक्तदान शिबिरे, चार ठिकाणी लाडू तुला आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

तसेच शुभेच्छुकांकडून येणारी भेट स्वरूपातील पुस्तके वाचनालयात वितरण करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय जनता पक्ष, चंद्रपूर महानगर यांच्या वतीने देण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande