
चंद्रपूर, 16 डिसेंबर, (हिं.स.)। चंद्रपूर महानगरपालिका मतदारक्षेत्रासाठी निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडणेकरीता महानगरपालिका प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे अशी माहिती चंद्रपूर महानगरपालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी अकुनुरी नरेश यांनी येथे बोलताना दिली.
सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमाची माहिती चंद्रपूर महानगरपालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी अकुनुरी नरेश यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
१. एकूण प्रभाग - १७
२. निवडून द्यायच्या उमेदवारांची संख्या - ६६
३. एकुण मतदार केंद्रांची संख्या - ३५५
४. एकुण मतदारांची संख्या - २ लक्ष ९९ हजार ९९४
पुरुष मतदार संख्या - १ लक्ष ४९ हजार ६०९
महिला मतदार संख्या - १ लक्ष ५० हजार ३५४
इतर मतदार संख्या – ३१
५. दिव्यांग पुरुष मतदार - ५३२
दिव्यांग महिला मतदार - २७५
एकुण दिव्यांग मतदार -८०७
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव