शेतकऱ्याला चक्क किडनीच विकावी लागली
चंद्रपूर, 16 डिसेंबर (हिं.स.)। नागभीड तालुक्याच्या मिंथुर गावातील गरीब शेतकरी रोशन कुडे या शेतकर्‍याला त्याच्यावरील कर्जासाठी चक्क त्याची किडनीच विकावी लागली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान या प्रकरणी सावकारांसह सहा जणांवर गुन्हा दा
शेतकऱ्याला चक्क किडनीच विकावी लागली


चंद्रपूर, 16 डिसेंबर (हिं.स.)। नागभीड तालुक्याच्या मिंथुर गावातील गरीब शेतकरी रोशन कुडे या शेतकर्‍याला त्याच्यावरील कर्जासाठी चक्क त्याची किडनीच विकावी लागली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान या प्रकरणी सावकारांसह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काही वर्षांपूर्वी रोशन याने दुधाचा व्यवसाय सुरू करण्यासाठी एक लाख रुपये व्याजाने खाजगी सावकाराकडून घेतले होते. मात्र, दुर्दैवाने त्याची जनावरे मेली आणि तो सावकारचे कर्ज फेडू शकला नाही. तेव्हापासून या खाजगी सावकाराने वारंवार पैसे देण्याचा तगादा लावला. दिवसेंदिवस पैसे थकत गेल्याने मुद्दलाची रक्कम आणि व्याजाच्या रकमेत मोठी वाढ झाली. अखेर त्या सावकाराने पैसे फेडण्यासाठी शेतकऱ्याला त्याची किडनी विकण्याचा सल्ला दिला. त्या सावकाराच्या सल्ल्यानेच रोशन कुठे या शेतकऱ्याने आधी कोलकाता आणि नंतर तिथून कंबोडिया येथे जाऊन ८ लाख रुपयांना स्वत:ची किडनी विकली. सावकारामुळेच माझ्यावर ही वेळ आल्याचा आरोप करत पीडित शेतकऱ्याने सावकारावर कारवाईची मागणी केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande