मतदान प्रक्रियेत सर्वांनी सहभाग नोंदवावा - चंद्रपूर आयुक्त
चंद्रपूर, 16 डिसेंबर, (हिं.स.)। राज्य निवडणूक आयोगाने दिनांक १५ डिसेंबर, २०२५ रोजी जाहीर केलेल्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ चे वेळापत्रकानुसार चंद्रपूर महानगरपालिका मतदार संघांकरीता १५ जानेवारी २०२६ (गुरुवार) रोजी सकाळी ७:३० ते सायं. ५:३० या कालावधी
मतदान प्रक्रियेत सर्वांनी सहभाग नोंदवावा - चंद्रपूर आयुक्त


चंद्रपूर, 16 डिसेंबर, (हिं.स.)। राज्य निवडणूक आयोगाने दिनांक १५ डिसेंबर, २०२५ रोजी जाहीर केलेल्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ चे वेळापत्रकानुसार चंद्रपूर महानगरपालिका मतदार संघांकरीता १५ जानेवारी २०२६ (गुरुवार) रोजी सकाळी ७:३० ते सायं. ५:३० या कालावधीत मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमाची माहिती चंद्रपूर महानगरपालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी अकुनुरी नरेश यांनी १६ डिसेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

चंद्रपूर महानगरपालिका मतदारक्षेत्रासाठी निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडणेकरीता महानगरपालिका प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे. चंद्रपूर मनपा झोन क्रमांक ३ कार्यालय येथे स्ट्रॉंग रूम बनविण्यात आली असुन मतमोजणी येथेच करण्यात येणार आहे, त्याचप्रमाणे सिंगल विंडो सिस्टम,टोल फ्री क्रमांक, आचारसंहिता कक्ष आदी सुविधा मनपातर्फे करण्यात येणार आहेत. मनपा क्षेत्रातील प्रत्येक मतदान केंद्रांवर दिव्यांग मतदाराकरीता त्यांचे मागणीचे अनुषंगाने 'व्हील चेअर' ची व्यवस्था करण्यांत आली आहे. निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार सर्व मतदान केंद्रांवर रॅम्प, पिण्याचे पाणी,बसण्याची व्यवस्था,प्रसाधनगृह या मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत असे अकुनुरी नरेश यांनी नमूद केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande