
छत्रपती संभाजीनगर, 16 डिसेंबर, (हिं.स.)। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे 17 डिसेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने तसेच भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ते समवेत होत असलेल्या बैठकीसाठी बावनकुळे छत्रपती संभाजी नगर येथे येत आहेत. या निमित्ताने चंद्रशेखर बावनकुळे हे मतदारांशी देखील संपर्क साधणार आहेत. फुलंब्री विधानसभा मतदारसंघाच्या भारतीय जनता पक्षाचे आमदार अनुराधा चव्हाण यांच्या उपस्थितीत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या १७ डिसेंबर रोजी होणाऱ्या जाहीर सभेच्या पार्श्वभूमीवर फुलंब्री येथे कॉर्नर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीत सभेच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली असून जास्तीत जास्त मतदार बांधवांनी यामध्ये सहभाग घ्यावा यासंदर्भात रणनीती आखण्यात आली.
या बैठकीसाठी जिल्हा अध्यक्ष श्री.सुहासभाऊ शिरसाट, श्री.शिवाजी महाराज पात्रीकर, श्री.जितेंद्र जयस्वाल, श्री.सर्जेराव मेटे, श्री.आप्पासाहेब काकडे, श्री.राजेंद्र डकले, मंडळाध्यक्ष श्री.सुचित बोरसे, श्री.गोपाल वाघ, ऐश्वर्याताई गाडेकर, भागूताई काकडे, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis