अमरावती - डम्पर चोरीचा गुन्हा उघड; १८ लाखांचा रेतीवाहक ट्रक जप्त
अमरावती, 16 डिसेंबर, (हिं.स.)। अमरावती शहर गुन्हे शाखेने गाडगे नगर पोलीस ठाण्यात दाखल डम्पर (रेती वाहक) चोरीचा गुन्हा उघडकीस आणत १८ लाख रुपये किमतीचा ट्रक जप्त केला आहे. दिनांक ११ डिसेंबर २०२५ रोजी फिर्यादी टिना विलास चव्हाण (महसूल अधिकारी) यांनी
डम्पर चोरीचा गुन्हा उघड; गुन्हे शाखेची कारवाई, १८ लाखांचा रेतीवाहक ट्रक जप्त


अमरावती, 16 डिसेंबर, (हिं.स.)। अमरावती शहर गुन्हे शाखेने गाडगे नगर पोलीस ठाण्यात दाखल डम्पर (रेती वाहक) चोरीचा गुन्हा उघडकीस आणत १८ लाख रुपये किमतीचा ट्रक जप्त केला आहे.

दिनांक ११ डिसेंबर २०२५ रोजी फिर्यादी टिना विलास चव्हाण (महसूल अधिकारी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, विनारॉयल्टी वाहतुकीप्रकरणी तहसील कार्यालय, अमरावती येथे कादेशीर कारवाईसाठी लावण्यात आलेला ट्रक क्रमांक MH-40-Y-3193 आरोपी गजानन काळपांडे याने पार्किंगमधून चोरून नेला होता. या प्रकरणी गाडगे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा समांतर तपास करताना गुन्हे शाखेला गुप्त बातमीदाऱ्यामार्फत माहिती मिळाली की सदर ट्रक नांदगाव पेठ हद्दीतील रिवा हॉटेलजवळील युनिव्हर्सल मोटर्स येथे आहे. पथकाने तेथे जाऊन तपास केला असता ट्रक मिळून आला. चौकशीत ट्रक चालक सुनील लक्ष्मणराव भांबुरकर (रा. वलगाव) याने हा ट्रक मालक गजानन काळपांडे यांच्या सांगण्यावरून तहसील कार्यालयातून आणल्याचे कबूल केले.

सदर ट्रक (MH-40-Y-3193) जप्त करून, ट्रक चालकास पुढील कार्यवाहीसाठी गाडगे नगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.ही कारवाई पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात स.पो.नि. मनीष वाकोडे, पोहवा सतीश देशमुख, फिरोज खान, मंगेश लोखंडे, प्रशांत मोहोड, पोलीस नाईक नाझीमोद्दीन सैय्यद, पोलीस रणजित गावंडे, चालक अमंलदार प्रभात पोकडे व गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande