गूगलचा एंड ऑफ इयर सेल भारतात सुरू
मुंबई, 16 डिसेंबर (हिं.स.)। टेक दिग्गज गूगलने भारतात आपली ‘एंड ऑफ इयर सेल’ सुरू केला असून, या सेलमध्ये पिक्सेल 10 सीरिजसह इतर डिव्हाइसेसवर आकर्षक सवलती दिल्या जात आहेत. या सीरिजमध्ये स्टँडर्ड Google Pixel 10, Pixel 10 Pro, Pixel 10 Pro XL आणि Pixel
Google Sale


मुंबई, 16 डिसेंबर (हिं.स.)। टेक दिग्गज गूगलने भारतात आपली ‘एंड ऑफ इयर सेल’ सुरू केला असून, या सेलमध्ये पिक्सेल 10 सीरिजसह इतर डिव्हाइसेसवर आकर्षक सवलती दिल्या जात आहेत. या सीरिजमध्ये स्टँडर्ड Google Pixel 10, Pixel 10 Pro, Pixel 10 Pro XL आणि Pixel 10 Pro Fold यांचा समावेश आहे.

स्मार्टफोनसोबतच Google Pixel Watch 3, Pixel Buds 2a आणि Pixel Buds Pro 2 खरेदीवरही ग्राहकांना डिस्काउंटचा फायदा मिळत आहे. हा सेल सोमवारी सुरू झाली असून, 2 जानेवारी 2026 रोजी रात्री 11.59 वाजता संपणार आहे. सर्व डिव्हाइस Google च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असून, निवडक बँकांच्या क्रेडिट कार्डवर EMI आणि कॅशबॅकचे पर्याय देण्यात आले आहेत.

या ‘End of Year Sale’ दरम्यान, ग्राहकांना Google Pixel 10 खरेदी करताना HDFC बँक क्रेडिट कार्डवर EMI ट्रान्झॅक्शन केल्यास 7,000 रुपयांचा इन्स्टंट कॅशबॅक मिळत आहे. तसेच Pixel 10 Pro, Pixel 10 Pro XL आणि Pixel 10 Pro Fold या मॉडेल्सवर HDFC बँक क्रेडिट कार्ड EMI व्यवहारावर 10,000 रुपयांचा थेट कॅशबॅक दिला जात आहे. ग्राहकांसाठी 24 महिन्यांपर्यंत इंटरेस्ट-फ्री EMI चा पर्यायही उपलब्ध आहे.

याशिवाय, मागील Pixel 9 सीरिजमधील फोनही मोठ्या सवलतीत विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. Google Pixel 9 हा 79,999 रुपयांच्या लॉन्च किमतीपेक्षा कमी, म्हणजेच 58,399 रुपयांत उपलब्ध करून देण्यात आला आहे. Pixel 9 Pro Fold आणि Pixel 9a हे फोनही अनुक्रमे 1,72,999 रुपये आणि 49,999 रुपयांच्या लॉन्च किमतीऐवजी 1,62,999 रुपये आणि 44,999 रुपयांत खरेदी करता येणार आहेत.

Google Pixel स्मार्टफोनसोबतच या सेलमध्ये Google Pixel Watch आणि Pixel Buds वरही सवलत देण्यात आली आहे. Pixel Watch 3 सध्या 22,915 रुपयांत उपलब्ध असून, यामध्ये सुमारे 5,000 रुपयांची कपात करण्यात आली आहे. तर Pixel Buds Pro 2 TWS ची किंमत सुमारे 3,000 रुपयांनी कमी होऊन 19,900 रुपये झाली आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे, Google Pixel 10 लाइनअप भारतात 20 ऑगस्ट रोजी लॉन्च करण्यात आला होता. सध्या स्टँडर्ड Pixel 10 ची किंमत 79,999 रुपये असून, Pixel 10 Pro, Pixel 10 Pro XL आणि Pixel 10 Pro Fold यांची किंमत अनुक्रमे 1,09,999 रुपये, 1,24,999 रुपये आणि 1,72,999 रुपये आहे. ही संपूर्ण सीरिज Google च्या नवीन Tensor 5 चिपसेटसह येते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande