
जळगाव , 16 डिसेंबर (हिं.स.) | गेल्या आठवडाभरापासून सोने-चांदीचे दर सर्वकालीन उच्चांक गाठत असून या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दोन्ही धातूंच्या दरात मोठी दरवाढ दिसून आली. यामुळे जळगाव शहरातील सुवर्ण नगरीत सोन्यासह चांदीने नवीन विक्रमी उच्चांक गाठला आहे.
जळगाव सराफ बाजारात सोमवारी दिवसभरात चांदीच्या भावात चार हजार ३०० रुपयांची वाढ होऊन ती विना जीएसटी १ लाख ९४ हजार रुपयांवर पोहोचली. तर सोन्याच्या भावात एक हजार ३०० रुपयांची वाढ होऊन ते एक लाख ३३ हजार ५०० रुपयांवर पोहोचले. सलग तीन दिवस भाववाढ झाल्यानंतर चांदीच्या भावात ही ४ हजार ३०० रुपयांची घसरण होऊन ती एक लाख ८९ हजार ७०० रुपयांवर आली होती. १४ रोजी याच भावावर स्थिर राहिल्यानंतर १५ रोजी चांदीच्या भावात चार हजार ३०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे ती पुन्हा एक लाख ९४ हजार रुपये प्रति किलोवर पोहोचली. सोन्याच्या भावात ९०० रुपयांची वाढ होऊन ते एक लाख ३२ हजार २०० रुपयांवर पोहोचले होते. भावावर स्थिर राहिल्यानंतर त्यात एक हजार ३०० रुपयांची वाढ झाली.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर