जळगाव : लाच घेताना महावितरणचा वरिष्ठ तंत्रज्ञ एसीबीच्या जाळ्यात
जळगाव, 16 डिसेंबर (हिं.स.) जिल्ह्यात लाचखोरीच्या घटना वाढताना दिसत असून अशातच महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञाला दोन हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. आत्माराम धना लोंढे (वय – ५७ वर्ष, वरिष्ठ तंत्रज्ञ, शहर उपविभाग १
जळगाव : लाच घेताना महावितरणचा वरिष्ठ तंत्रज्ञ एसीबीच्या जाळ्यात


जळगाव, 16 डिसेंबर (हिं.स.) जिल्ह्यात लाचखोरीच्या घटना वाढताना दिसत असून अशातच महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञाला दोन हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. आत्माराम धना लोंढे (वय – ५७ वर्ष, वरिष्ठ तंत्रज्ञ, शहर उपविभाग १, जळगाव एमएसईबी (वर्ग ३)) असं लाचखोर वरिष्ठ तंत्रज्ञाचे नाव असून या कारवाईने खळबळ उडाली आहे.यातील तक्रारदार हे डॉक्टर आहेत तक्रारदार यांना त्यांच्या मुलाच्या नावे नवीन वीज मीटर घेण्यासाठी वायरमन आत्माराम लोंढेना भेटून कागदपत्रांबाबत विचारणा केली असता त्यांनी नवीन वीज मीटर बसवण्यासाठी चार हजार रुपयाची मागणी केली होती. त्यावेळी तक्रारदार यांनी त्यांचे म्हणण्याप्रमाणे चार हजार रुपये दिले होते. त्यानंतर देखील आत्माराम लोंढे याने तक्रारदार यांचे वीज मीटर चे काम केले नव्हते. म्हणून तक्रारदार यांनी लोंढे यांना वीज मीटर संदर्भात विचारणा केली असता त्यांनी आणखी दोन हजार रुपये द्यावे लागतील असे म्हणून तक्रारदारांकडे दोन हजार रुपये लाच मागणी करत असल्याबाबत तक्रारदार यांनी ला. प्र. वि. जळगाव पथकाकडे तक्रार दिली होती. तक्रारदार यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने लोंढे याने तक्रारदार यांचे मुलाचे नावे नवीन वीज मीटर बसून देण्यासाठीच्या मोबदल्यात २,०००/- रूपयेची लाचेची मागणी करून तक्रारदार यांचेकडून पंचांसमक्ष स्वतः स्वीकारली आहे. याबाबत लाचखोर आत्माराम धना लोंढे विरुद्ध एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande