
छत्रपती संभाजीनगर, 16 डिसेंबर (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या शहर विकास आराखड्यातील गंभीर त्रुटींविरोधात आमदार संजय केनेकर यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडली. यासंदर्भात आज पत्रकार परिषद घेऊन वस्तुस्थिती माध्यमांसमोर मांडली. चुकीच्या बेस मॅपमुळे अनेक प्राचीन व श्रद्धास्थाने डीपी रोडमध्ये बाधित दाखविण्यात आली असून हे शहराच्या धार्मिक व सांस्कृतिक परंपरेसाठी गंभीर बाब असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी विधान परिषदेचे आमदार संजय केनेकर,माजी महापौर श्री.बापु घडामोडे,अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष श्री.सचिन मिसाळ उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis