परभणी महानगरपालिका निवडणूकीसाठी यंत्रणा सज्ज
परभणी, 16 डिसेंबर (हिं.स.)।परभणी महानगरपालिका निवडणूकीसाठी यंत्रणा सज्ज आहे अशी आयुक्त तथा निवडणूक अधिकारी नितीन नार्वेकर यांनी माहिती दिली . निवडणूकीचा सविस्तर तपशील जाहीर करण्यात आला आहे परभणी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीच्य
परभणी महानगरपालिका निवडणूकीसाठी यंत्रणा सज्ज


परभणी, 16 डिसेंबर (हिं.स.)।परभणी महानगरपालिका निवडणूकीसाठी यंत्रणा सज्ज आहे अशी आयुक्त तथा निवडणूक अधिकारी नितीन नार्वेकर यांनी माहिती दिली . निवडणूकीचा सविस्तर तपशील जाहीर करण्यात आला आहे

परभणी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या दृष्टीने यंत्रणा सर्वतोपरि सज्ज असल्याची माहिती मनपाचे आयुक्त तथा निवडणूक अधिकारी नितीन नार्वेकर यांनी मंगळवारी एका पत्रकार परिषदेतून दिली.

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे महानगरपालिकेचा निवडणूकीचा कार्यक्रम निश्‍चित झाला आहे. या निश्‍चित कार्यक्रमानुसार एकूण 16 प्रभागासाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी 1 जूलै 2025 च्या मतदार याद्या ग्राह्य धरण्यात येणार आहे. 23 डिसेंबरपासून सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत 30 डिसेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज स्विकारले जाणार आहेत. या उमेदवारी अर्जाची 31 डिसेंबर रोजी छाननी, पात्र, अपात्र उमेदवारांची लगेचच यादी प्रसिध्द केली जाणार असून 2 जानेवारी रोजी सकाळी 11 ते 3 या वेळेत उमेदवारी अर्ज माघारीची अंतीम मुदत असणार आहे.

3 जानेवारी रोजी निवडणूक चिन्ह वितरित केले जाणार असून अंतीमरीत्या निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांची यादीही त्याच दिवशी प्रकाशित केली जाणार आहे. तसेच 15 जानेवारी रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार आहे. तर 16 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी सुरु होणार आहे, असे ते म्हणाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande