माईस हबचा ठेका शासनाकडून अखेर रद्द, पर्यावरण प्रेमींची काम रद्द करण्याची मागणी
नाशिक, 16 डिसेंबर (हिं.स.)। - तपोवनामध्ये होत असलेल्या माईस हबच्या ठेक्याला रद्द करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र शासनाने ऑनलाईन घोषित केलेली आहे. यामुळे मागील 21 दिवसापासून अधिक काळ सुरू असलेल्या संघर्षाला काहीसे यश आले असले तरी अजून पर्यंत ह
माईस हबचा ठेका शासनाकडून अखेर रद्द, पर्यावरण प्रेमींची काम रद्द करण्याची मागणी


नाशिक, 16 डिसेंबर (हिं.स.)।

- तपोवनामध्ये होत असलेल्या माईस हबच्या ठेक्याला रद्द करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र शासनाने ऑनलाईन घोषित केलेली आहे. यामुळे मागील 21 दिवसापासून अधिक काळ सुरू असलेल्या संघर्षाला काहीसे यश आले असले तरी अजून पर्यंत ही योजना रद्द करण्यात आलेली नाही.

नाशिक मधील तपोवन या ठिकाणी झाडांची छाटणी करून त्या ठिकाणी माईस हब उभारणीच्या कामाला सुरुवात केली जाणार होती बांधा वापरा हस्तांतरित करा या तत्त्वानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून माईस हबची निर्मिती केली जाणार होती परंतु या ठिकाणी असलेल्या झाडांची कत्तल करू नये यासाठी मागील 21 दिवसापासून अधिक काळ पर्यावरण प्रेमी नागरिकांनी वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन केली त्यामध्ये अनेक सामाजिक, राजकीय, विविध सिने - नाट्य कलावंत तसेच जिल्ह्याच्या बाहेरील संघटना देखील सहभागी झाल्या आणि या आंदोलनाला मोठी धार चढली होती.

या सर्व प्रश्नांचा विरोध डावलून कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी काल सोमवारी नाशिक मध्ये 15000 झाडांचे वृक्षारोपण करण्याचा कार्याच्या शुभारंभ केला यावेळी विविध साधू महंत देखील उपस्थित होते साधू महंत देखील या ठिकाणी असलेले अनावश्यक झाड तोडण्याची परवानगी दिलेली होती.

हा सर्व विरोध असताना महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईट वरती एक शहरातील तपोवन या ठिकाणी सुरू असलेल्या माईस हबच्या कामाचा ठेका रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आलेले आहे यामध्ये नाशिक महानगरपालिकेच्या कारणांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे पण निश्चित कोणत्या कारणाने ठेका रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले नाही.

माईस हब स्थगिती झाली होती.

आता कॅन्सलेशन करण्यात आल्याचे समजते.

कृपया खुलासा करावा.

तपोवन वाचवा चळवळ सातत्याने मागणी करत आहे. झाडे तोडून तपोवनात

माईस नको. याची दखल घ्या. मनपा आयुक्त यांनी खुलासा करावा अशी मागणी

तपोवन वाचवा चळवळ वतीने करत आहोत.

_ कॉ. राजू देसले तपोवन वाचवा चळवळ

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande