परभणीत उद्या आरोग्य तपासणी शिबीर व चर्चासत्राचे आयोजन
परभणी, 16 डिसेंबर, (हिं.स.)। राष्ट्रीय निवृत्ती वेतनधारक दिनानिमित्त 17 डिसेंबर रोजी आरोग्य तपासणी शिबीर व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांच्या हक्कांबाबत तसेच त्यांच्या विविध समस्यांबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 17 डिसें
परभणीत उद्या आरोग्य तपासणी शिबीर व चर्चासत्राचे आयोजन


परभणी, 16 डिसेंबर, (हिं.स.)। राष्ट्रीय निवृत्ती वेतनधारक दिनानिमित्त 17 डिसेंबर रोजी आरोग्य तपासणी शिबीर व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

निवृत्त कर्मचाऱ्यांच्या हक्कांबाबत तसेच त्यांच्या विविध समस्यांबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 17 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय निवृत्ती वेतनधारक दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त जिल्हा परिषद, परभणी यांच्या वतीने 17 डिसेंबर 2025 रोजी जिल्हा परिषद सभागृहात सकाळी 11 वाजता निवृत्ती वेतनधारकांसाठी आरोग्य तपासणी शिबीर तसेच चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरास जास्तीत जास्त निवृत्ती वेतनधारकांनी उपस्थित राहून आरोग्य तपासणी शिबीर व चर्चासत्राचा लाभ ध्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande