परभणी महानगरपालिकेकरीता 2 लाख 61 हजार 239 मतदार
परभणी, 16 डिसेंबर (हिं.स.)। परभणी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीत 1 लाख 32 हजार 595 पुरुष, 1 लाख 28 हजार 635 महिला व इतर 9 असे एकूण 2 लाख 61 हजार 239 मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. परभणी महानगरपालिका हद्दीत एकूण 16 प्रभ
परभणी महानगरपालिकेकरीता 2 लाख 61 हजार 239 मतदार


परभणी, 16 डिसेंबर (हिं.स.)। परभणी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीत 1 लाख 32 हजार 595 पुरुष, 1 लाख 28 हजार 635 महिला व इतर 9 असे एकूण 2 लाख 61 हजार 239 मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.

परभणी महानगरपालिका हद्दीत एकूण 16 प्रभाग आहेत. त्यातील सदस्य संख्या 65 एवढी आहे. त्यापैकी 4 सदस्यीय प्रभाग संख्या 15 व पाच सदस्यीय प्रभाग संख्या 1 अशी असणार आहे. यातील अनुसूचित जातीसाठी एकूण 8 जागा, त्यापैकी 4 महिलांकरीता, अनुसूचित जमातीसाठी 1 जागा, नागरीकांचा मागास प्रवर्गासाठी एकूण 17 जागा, त्यापैकी 9 महिलांकरीता, तसेच सर्वसाधारण गटाकरीता एकूण 39 जागा, त्यापैकी 19 जागा महिलांकरीता एकूण 65 जागांपैकी 33 जागा महिलांकरीता आरक्षित असणार आहेत, अशी माहिती आयुक्त श्री. नार्वेकर यांनी दिली.

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीकरीता 343 मतदान केंद्रे स्थापन केली जाणार आहेत. चार सदस्यीय प्रभागात 311 मतदान केंद्रे असून पाच सदस्यीय प्रभागात 32 मतदान केंद्रे असणार आहेत. निवडणूकीकरीता राज्य निवडणूक आयोगाने ईलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्र उपलब्ध केली असून त्या प्रमाणे 380 कन्ट्रोल युनिट, 1 हजार 140 बॅलेट युनिट व 380 मेमरी उपलब्ध असणार आहेत.

या निवडणूकांकरीता पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करण्यात आले आहे. एकूण पाच निवडणूक निर्णय अधिकारी, 12 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, 35 झोनल अधिकारी, 45 मास्टर ट्रेनर्स तैनात करण्यात येणार असून मतदान केंद्रांवर 380 केंद्राध्यक्ष, प्रत्येकी 3 झोनमध्ये 380 मतदान अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. निवडणूक खर्चावर लक्ष असावे, यासाठी 20 (पाच पथके) एकूण अंदाजे 1 हजार 950 कर्मचारी आवश्यक आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande