राष्ट्रपती भवनात ‘परम वीर दीर्घा’चे उद्घाटन
नवी दिल्ली, 16 डिसेंबर (हिं.स.)। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 16 डिसेंबर रोजी विजय दिनाच्या निमित्ताने राष्ट्रपती भवन येथे ‘परम वीर दीर्घा’चे उद्घाटन केले. या दालनामध्ये परम वीर चक्र ने सन्मानित सर्व 21 योद्ध्यांची पोर्ट्रेट्स प्रदर्शित करण्यात
President


President Param Vir Gallery


नवी दिल्ली, 16 डिसेंबर (हिं.स.)। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 16 डिसेंबर रोजी विजय दिनाच्या निमित्ताने राष्ट्रपती भवन येथे ‘परम वीर दीर्घा’चे उद्घाटन केले.

या दालनामध्ये परम वीर चक्र ने सन्मानित सर्व 21 योद्ध्यांची पोर्ट्रेट्स प्रदर्शित करण्यात आली आहेत. देशाच्या रक्षणासाठी ज्यांनी असामान्य निर्धार आणि अदम्य भावनेचे दर्शन घडवले त्या आपल्या राष्ट्रीय नायकांची माहिती अभ्यागतांना करून देण्याच्या उद्देशाने ही दीर्घा तयार करण्यात आली आहे. मातृभूमीच्या सेवेसाठी आपले बलिदान देणाऱ्या शूर वीरांच्या स्मृतींचा सन्मान करणारा देखील हा उपक्रम आहे.

ज्या दालनामध्ये आता ‘परम वीर दीर्घा’ तयार करण्यात आली आहे, त्यामध्ये पूर्वी ब्रिटिश एडीसींची पोर्ट्रेट्स प्रदर्शित करण्यात आली होती. भारताच्या राष्ट्रीय नायकांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन करण्याचा हा उपक्रम म्हणजे वसाहतवादी सत्तेच्या काळातील मानसिकतेला झुगारून भारतीय संस्कृती, वारसा आणि शाश्वत परंपरांचा अंगिकार करणारे एक अर्थपूर्ण पाऊल आहे. परमवीर चक्र हा भारताचा सर्वोच्च लष्करी सन्मान असून युद्धामध्ये शौर्य, साहस आणि स्वयं-त्यागाच्या असामान्य कामगिरीसाठी प्रदान केला जातो.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande