
पुणे, 16 डिसेंबर, (हिं.स.)। आधीच चार सदस्यांचा प्रभाग, त्यात प्रभागातील मतदारसंघात १ लाखांपेक्षा अधिक मतदार आणि प्रचाराला मिळणारे अवघे अकरा दिवस, यामुळे महापालिका निवडणुकीत मोठया राजकीय पक्षांसह, अपक्ष आणि चिन्ह नसलेल्या राजकीय पक्षांच्या उमेदवारांची चांगलीच दमछाक होणार आहे.
निवडणुक आयोगाच्या वेळापत्रकानुसार ३ जानेवारीला चिन्ह वाटप आणि अंतीम उमेदवार यादी जाहीर होणार आहे. १३ जानेवारीला सायंकाळी पाच वाजता जाहीर प्रचाराची सांगता होणार आहे. त्यामुळे उमेदवारांना प्रचारासाठी अवघे अकरा दिवसच मिळणार आहेत.महापालिकेच्या येत्या जानेवारीत होणाऱ्या निवडणुकांचे वेळापत्रक आयोगाकने जाहीर केले आहे.महापालिकेच्या निवडणुका ४ सदस्य प्रभाग पध्दतीने होणार आहेत. यात नव्याने समाविष्ट झालेल्या गावांचाही समावेश करण्यात आला आहे. प्रभाग रचना करताना २०१७ च्या जुन्या प्रभागांना नवीन समाविष्ट गावांशी जोडण्यात आले आहेत. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रभाग छोटे झाले असून उपनगरांमधील प्रभागांचा आकार मोठा झाला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु