परभणीत शेतकरी संघर्ष समितीद्वारे चार तास रास्तारोको
परभणी, 16 डिसेंबर (हिं.स.)। गंगाखेड तालुक्यातील जी-7 शुगर्स व आमडापुर येथील श्री लक्ष्मीनृसिंह शुगर्सने ऊसास पहिली उचल 3 हजार रुपये व अंतीम दर 4 हजार रुपये एवढा भाव द्यावा, यासाठी ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने परभणी ते गंगाखेड रस्त्
परभणीत शेतकरी संघर्ष समितीद्वारे चार तास रास्तारोको


परभणी, 16 डिसेंबर (हिं.स.)।

गंगाखेड तालुक्यातील जी-7 शुगर्स व आमडापुर येथील श्री लक्ष्मीनृसिंह शुगर्सने ऊसास पहिली उचल 3 हजार रुपये व अंतीम दर 4 हजार रुपये एवढा भाव द्यावा, यासाठी ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने परभणी ते गंगाखेड रस्त्यावरील खळी पाटीवर चार तास रास्तारोको आंदोलन केले. त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प होती. पोलिस प्रशासनाने वाहतूक महातपुरी व नृसिंह पोखर्णी मार्गे वळविण्याचा प्रयत्न केला. तसेच ऊस उत्पादक शेतकर्‍यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, या आंदोलनात माजी आमदार डॉ. मधुसुदन केंद्रे, राजन क्षीरसागर, अजय बुरांडे, ओंकार पवार, सुरेश इखे, रामेश्‍वर मोकाशे, डॉ. सुभाष कदम, बंडु सोळंके आदी सहभागी झाले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande