
नाशिक, 16 डिसेंबर (हिं.स.)। नाशिक महानगरपालिका निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उबाठा यांच्यामध्ये युती करूनच निवडणूक लढण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्याबाबत येणारा आठवड्यात सविस्तर चर्चा होणार आहे.
महानगरपालिका निवडणुकींच्या बिगुल वाजल्यानंतर राजकीय हालचाली देखील गतिमान झालेले आहेत . राजकीय पक्षांनी आपली तयारी सुरू केलेली आहे . निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच भाजपाकडून इच्छुकांच्या मुलाखती सुरू झालेले आहेत तर शिवसेना शिंदे गटाच्या वतीने कार्यकर्त्यांचा मेळावा हा संपन्न झाला आहे . या मेळाव्यामध्ये राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सन्मानपूर्वक युती भाजपाने करावी अशी मागणी केली आहे . नाहीतर स्वबळावर लढण्याचे संकेत त्यांनी दिले आहे हे सर्व घडत असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी (अजित पवार गट) मधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती गुरुवार, दिनांक १८ डिसेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ होणार असल्याची माहिती शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी दिली.
या हालचालींवर आता नाशिक मध्ये काय परिस्थिती असताना यावर वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात आहेत महत्त्वाचं म्हणजे महाविकासआघाडी आता ठाकरे बंधूंची वेगळी चूल नाशिक मध्ये देखील दिसून येणार आहे.नाशिक मध्ये होत असलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना यांची एकत्र युती होणार आहे . त्यामुळे शिवसेना उबाठा महाविकास आघाडी मधून नाशिक मध्ये बाहेर पडल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत मंगळवारी सकाळी उबाठा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले की, मुंबई ठाणा सह ज्या ठिकाणी मनसे आणि शिवसेनेची युती होणार आहे त्यामध्ये नाशिकचा समावेश आहे.नाशिक मध्ये निश्चित काय भूमिका घ्यायची जागावाटप कशी करायची याबाबतचा निर्णय पुढील आठवड्यामध्ये स्पष्ट करण्यात येणार असून त्या दृष्टिकोनातून उमेदवारांची चाचणी देखील सुरू झाले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV