सोलापूर : श्रीदेवी फुलारेंनी भाजपकडे उमेदवारी मागणी अर्ज केला दाखल
सोलापूर, 16 डिसेंबर (हिं.स.)। काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेल्या काँग्रेसच्या माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारी मागणी अर्ज दाखल केला आहे. आपले पत
सोलापूर : श्रीदेवी फुलारेंनी भाजपकडे उमेदवारी मागणी अर्ज केला दाखल


सोलापूर, 16 डिसेंबर (हिं.स.)। काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेल्या काँग्रेसच्या माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारी मागणी अर्ज दाखल केला आहे.

आपले पती जॉन फुलारे यांच्यासोबत उमेदवारी मागणी अर्ज भरत त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर व माजी नगरसेवक नारायण बनसोडे यांच्याकडे दाखल केला आहे. प्रभाग पंधरा मधून फुलारे या दोन वेळा नगरसेविका आहेत. विधानसभा निवडणुकीत तयार झालेले वातावरण तसेच शहर मध्य मतदारसंघ भाजपकडे गेल्याने एकूणच परिस्थिती पाहून फुलारे यांनी भाजप प्रवेश केला.

प्रभाग पंधरा मधील सहकारी नगरसेविका वैष्णवी करगुळे या पहिलेच भाजपमध्ये गेल्या आहेत त्यामुळे आता उमेदवारीसाठी रस्सीखेच असणार आहे.फुलारे यांनी उमेदवारी मागणी करत अनुसूचित जाती आणि सर्वसाधारण जागेसाठी उमेदवारी मागणी केल्याचे सांगितले. यंदा या प्रभागातून भाजपचे चारही नगरसेवक निवडून येतील असा दावा त्यांनी केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande