सोलापूर - विद्यार्थिनींवर अत्याचार करणारा शिक्षक बडतर्फ
सोलापूर, 16 डिसेंबर (हिं.स.)मोहोळ तालुक्यातील पाटकूल-सातपुते वस्ती येथील जिल्हा परिषद शाळेवरील शिक्षकास सेवेतून बडतर्फ करण्याची कारवाई मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी केली. धनाजी सोपान इंगळे असे त्या शिक्षकाचे नाव आहे. विद्यार्थिनींवर अत्
सोलापूर - विद्यार्थिनींवर अत्याचार करणारा शिक्षक बडतर्फ


सोलापूर, 16 डिसेंबर (हिं.स.)मोहोळ तालुक्यातील पाटकूल-सातपुते वस्ती येथील जिल्हा परिषद शाळेवरील शिक्षकास सेवेतून बडतर्फ करण्याची कारवाई मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी केली. धनाजी सोपान इंगळे असे त्या शिक्षकाचे नाव आहे. विद्यार्थिनींवर अत्याचार केल्याप्रकरणी न्यायालयाने या शिक्षकास जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. अखेर जिल्हा परिषदेस उशिरा जाग आली असून त्याच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे.सातपुते वस्ती येथील जिल्हा परिषद शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी सोलापूर न्यायालयाने धनाजी सोपान इंगळे या शाळेतील शिक्षकाला नैसर्गिक मृत्यूपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये हा निकाल देण्यात आला. शाळेजवळ काम करणाऱ्या एका शेतकऱ्याला शिक्षकाचे वर्तन संशयास्पद वाटले, त्याच्या सतर्कतेमुळे हे प्रकरण उघडकीस आले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande