
रत्नागिरी, 16 डिसेंबर, (हिं. स.) : जिल्हा उद्योग केंद्राच्या विविध योजनांची माहिती सुशिक्षित युवक, युवती तसेच नागरिकांना मिळावी, या उद्देशाने बुधवारी, दि. १७ डिसेंबर रोजी चिपळूणच्या आनंदराव पवार कॉलेजमध्ये माहिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही कार्यशाळा सकाळी ११ वाजता सुरू होणार असून उद्योग, व्यवसाय, स्वयंरोजगार व शासकीय योजनांमध्ये रस असलेल्या व्यापारी, युवक व युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. जिल्हा उद्योग केंद्राच्या विविध योजनांची सविस्तर माहिती, मार्गदर्शन व शंका-निरसन या कार्यशाळेत करण्यात येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी