अभिज्ञान कुंडूच्या द्विशतकाच्या जोरावर भारताचा मलेशियावर 315 धावांनी ऐतिहासिक विजय
दुबई, 16 डिसेंबर (हिं.स.)दुबई येथे खेळल्या जाणाऱ्या १९ वर्षांखालील आशिया कपमध्ये भारताने मलेशियाचा ३१५ धावांनी पराभव करून इतिहास रचला. भारताने प्रथम फलंदाजी करताना ४०८ धावा केल्या होत्या. मलेशियन संघ अवघ्या ९३ धावांवर गारद झाला. तत्पूर्वी, अभिज्ञान
अभिज्ञान कुंडू


दुबई, 16 डिसेंबर (हिं.स.)दुबई येथे खेळल्या जाणाऱ्या १९ वर्षांखालील आशिया कपमध्ये भारताने मलेशियाचा ३१५ धावांनी पराभव करून इतिहास रचला. भारताने प्रथम फलंदाजी करताना ४०८ धावा केल्या होत्या. मलेशियन संघ अवघ्या ९३ धावांवर गारद झाला. तत्पूर्वी, अभिज्ञान कुंडूच्या नाबाद २०९ धावांच्या ऐतिहासिक खेळीमुळे, द सेव्हन्स स्टेडियमवर नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने ५० षटकांत ७ बाद ४०८ धावा केल्या. अभिज्ञान कुंडूला त्याच्या २०९ धावांसाठी सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

१९ वर्षांखालील आशिया कपमध्ये टीम इंडियाने आपली विजयी मालिका कायम ठेवली आहे. मंगळवारी तिसऱ्या सामन्यात भारताने मलेशियासमोर विजयासाठी ४०९ धावांचे लक्ष्य ठेवले. अभिज्ञान कुंडूच्या नाबाद द्विशतकामुळे संघाने ५० षटकांत सात गडी गमावून ४०८ धावा केल्या. कुंडूने १२५ चेंडूंत १७ चौकार आणि 9 षटकारांसह २०९ धावांची धमाकेदार खेळी केली. या काळात त्याचा स्ट्राईक रेट १६७.२० होता. दरम्यान, वेदांत त्रिवेदीने १०६ चेंडूत ९० धावा केल्या. वैभव सूर्यवंशीनेही २६ चेंडूत ५० धावांची तुफानी खेळी केली. भारताने यापूर्वी लीग टप्प्यात यूएई आणि पाकिस्तानला पराभूत केले होते.

प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार आयुष म्हात्रे सात चेंडूत १४ धावा करून बाद झाला. त्यानंतर विहान मल्होत्राने सात धावा केल्या. त्यानंतर वैभवने वेदांतसोबत ४० धावांची भागीदारी केली. वैभवने ५० धावांच्या खेळीत 5 चौकार आणि 3 षटकार मारले. त्यानंतर वेदांतने कुंडूसोबत चौथ्या विकेटसाठी २०९ धावांची भागीदारी केली.

वेदांतचे शतक हुकला. त्याने ९० धावांच्या खेळीत सात चौकार मारले. हरवंश पंगालिया पाच धावांवर आणि कनिष्क चौहान १४ धावांवर बाद झाला. खिलन पटेल फक्त दोन धावा करू शकला. कुंडूसोबत दीपेश देवेंद्रनने चार धावा काढून नाबाद राहिला. मलेशियाकडून मोहम्मद अक्रमने सर्वाधिक पाच विकेट्स घेतल्या, तर शांताकुमारन आणि जसविन कृष्णमूर्ती यांनी प्रत्येकी एकेक विकेट घेतली.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande