सोलापूर : जादा परताव्याच्या आमिषाने २४ लाखांची फसवणूक
सोलापूर, 16 डिसेंबर (हिं.स.)।पैसे गुंतवणुकीवर अधिक परतावा देण्याचे आमिष दाखवून २४ लाख ५० हजारांहून अधिक रकमेची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांसह सहा जणांविरुद्ध अकलूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.इन्फिनिटी बीकॉन फायनान्शिअल सर्व्हिसेस, आय बी प्रो डे
सोलापूर : जादा परताव्याच्या आमिषाने २४ लाखांची फसवणूक


सोलापूर, 16 डिसेंबर (हिं.स.)।पैसे गुंतवणुकीवर अधिक परतावा देण्याचे आमिष दाखवून २४ लाख ५० हजारांहून अधिक रकमेची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांसह सहा जणांविरुद्ध अकलूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.इन्फिनिटी बीकॉन फायनान्शिअल सर्व्हिसेस, आय बी प्रो डेस्क कंपनी, मास्टर सिनर्जी एज्युटेक एलएलपी या कंपन्यांकडून फिर्यादी महिलेस २४ लाख ५० हजार आणि इतर १४ गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक घेऊन त्यांना कोणताही परतावा न देता तसेच त्यांची गुंतवणूक रक्कम परत न देता फिर्यादी व गुंतवणूकदारांची खूप मोठी आर्थिक फसवणूक केली.याबाबत कंपनीचे संचालक व एजंट नवनाथ जगन्नाथ अवताडे व शुभम नवनाथ अवताडे, सुवर्णा नवनाथ अवताडे (तिघेही रा. फळवणी, सध्या रा. राजश्री शाहू सोसायटी, बिबवेवाडी, पुणे), अशोक पवार, उमा पवार, आदेश पवार (तिघेही रा. उघडेवाडी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांच्या विरुद्ध अकलूज पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande