परभणी : राष्ट्रीय लोक अदालतीत 3,813 प्रकरणे निकाली
परभणी, 16 डिसेंबर, (हिं.स.)। जिल्ह्यात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणी यांच्या वतीने राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोक अदालतीत एकूण 3 हजार 813 तडजोडपात्र प्रकरणे निकाली काढण्यात आली असून त्यातून 16 कोटी 21 हजार 871 इतक्या रकम
16 कोटींहून अधिक रकमेची वसुली


परभणी, 16 डिसेंबर, (हिं.स.)। जिल्ह्यात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणी यांच्या वतीने राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोक अदालतीत एकूण 3 हजार 813 तडजोडपात्र प्रकरणे निकाली काढण्यात आली असून त्यातून 16 कोटी 21 हजार 871 इतक्या रकमेची वसुली करण्यात आली.

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये सर्व प्रकारची तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, भारतीय चलनक्षम दस्तऐवज अधिनियम 1881 अंतर्गत प्रकरणे, बँक वसूली, मोटार अपघात दावे, कौटुंबिक वाद, कामगार विषयक, भू-संपादन, वीज (चोरी वगळून), पाणी आकार, वेतन व भत्ते, सेवा विषयक, महसूल तसेच इतर दिवाणी स्वरूपाची व वाद दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती.

न्यायालयातील प्रलंबित तडजोडपात्र 745 प्रकरणे निकाली काढण्यात येऊन 13 कोटी 54 लाख 42 हजार 560 इतकी वसुली झाली. तसेच स्पेशल ड्राईव्ह अंतर्गत 933 प्रकरणे निकाली काढण्यात आली. वाद दाखलपूर्व इतर 2 हजार 135 प्रकरणे निकाली निघून 2 कोटी 45 लाख 79 हजार 311 इतकी रक्कम वसूल झाली.

या राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्षा.उज्वला म. नंदेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडले. सर्व न्यायाधीश, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. एस. टी. अडकिणे तसेच सर्व वकील बांधवांनी या लोक अदालतीच्या यशस्वीतेसाठी मोलाचे योगदान दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande