ठाणे - गेल्या 24 तासात एकूण 1404 अनधिकृत पोस्टर्सवर कारवाई
ठाणे, 16 डिसेंबर, (हिं.स.) : ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर शहरातील अनधिकृत जाहिराती, बॅनर्स व पोस्टर्स हटविण्याची मोहीम ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत सुरू आहे. दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी द
ठाणे


ठाणे, 16 डिसेंबर, (हिं.स.) : ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर शहरातील अनधिकृत जाहिराती, बॅनर्स व पोस्टर्स हटविण्याची मोहीम ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत सुरू आहे. दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 4.00 वाजल्यापासून आचारसंहिता लागू झाल्यानंतर दिनांक 16 डिसेंबर 2025 पर्यंत शहरातील एकूण 1404 अनधिकृत पोस्टर्स व बॅनर्स हटविण्यात आले आहेत.

दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार असून, त्या पार्श्वभूमीवर शहरात लागू करण्यात आलेल्या आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्यात येत आहे. निवडणूक विभागाचे उपायुक्त श्री. उमेश बिरारी यांच्या सूचनेनुसार सहायक आयुक्त्‍ सोपान भाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील 9 प्रभाग समित्यांमधील पदनिर्देशित अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त यांच्यामार्फत अनधिकृत बॅनर्स, वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे होर्डिंग्ज, भित्तीपत्रके व पोस्टर्स हटविण्याची कारवाई करण्यात आली. तसेच लोकप्रतिनिधींची नावे असलेल्या विकासकामांच्या कोनशीला झाकण्याची कार्यवाही महापालिकेच्यावतीने करण्यात आली.

दि. 15 डिसेंबर 2025 ते दि. 16 डिसेंबर 2025 दरम्यान करण्यात आलेल्या कारवाईचा प्रभागनिहाय तपशील पुढीलप्रमाणे *:

नौपाडा–कोपरी प्रभाग समिती – 204

वागळे प्रभाग समिती – 257

लोकमान्य सावरकरनगर प्रभाग समिती – 257

वर्तकनगर प्रभाग समिती – 275

माजिवडा–मानपाडा प्रभाग समिती – 107

उथळसर प्रभाग समिती – 169

कळवा प्रभाग समिती – 21

मुंब्रा प्रभाग समिती – 15

दिवा प्रभाग समिती – 99

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande