नालासोपाऱ्यात तिसरी राष्ट्रीय कराटे स्पर्धा; देशभरातील २००हून अधिक खेळाडू होणार सहभागी
पालघर, 19 डिसेंबर (हिं.स.)। विनर्स कप २०२५ अंतर्गत कराटे प्रिमियर लीग पर्व–३ ही तिसरी राष्ट्रीय कराटे स्पर्धा येत्या रविवारी (दि. २१ डिसेंबर) नालासोपाऱ्यात संपन्न होणार आहे. विनर्स स्पोर्ट्स क्लबच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून देशभरा
नालासोपाऱ्यात तिसरी राष्ट्रीय कराटे स्पर्धा; देशभरातील २००हून अधिक खेळाडू होणार सहभागी


पालघर, 19 डिसेंबर (हिं.स.)। विनर्स कप २०२५ अंतर्गत कराटे प्रिमियर लीग पर्व–३ ही तिसरी राष्ट्रीय कराटे स्पर्धा येत्या रविवारी (दि. २१ डिसेंबर) नालासोपाऱ्यात संपन्न होणार आहे. विनर्स स्पोर्ट्स क्लबच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून देशभरातील १५ राज्यांतील २००हून अधिक कराटेपटू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

शोतोकाई कराटे असोसिएशनच्या मान्यतेखाली होणारी ही तिसरी राष्ट्रीय स्पर्धा नालासोपारा पश्चिमेतील छडा नगर येथील वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या कला रंगमंचावर आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, केरळ, दिल्ली, राजस्थान आदी राज्यांतील खेळाडूंनी नोंदणी केली असल्याची माहिती आयोजक, आशियाई सुवर्णपदक विजेते व विनर्स स्पोर्ट्स क्लबचे संचालक सागर शेलार यांनी दिली.

या स्पर्धेत चार वर्षांपासून खुल्या गटापर्यंत महिला व पुरुष गटांचा समावेश असणार आहे. विजेत्या स्पर्धकांना आकर्षक चषक, रोख पारितोषिके व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. स्पर्धेचे परीक्षण राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे पंच करणार असल्याची माहिती विनर्स स्पोर्ट्स क्लबच्या सहसचिवा पल्लवी म्हात्रे-दळवी यांनी दिली.

कराटे प्रशिक्षणामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास, शारीरिक बळकटी तसेच स्वसंरक्षणाची क्षमता विकसित होते. हे प्रशिक्षण केवळ शारीरिक नसून मानसिक शिस्त, एकाग्रता व सामाजिक कौशल्ये घडविण्यासही उपयुक्त ठरते, असेही त्यांनी नमूद केले.

विनर्स स्पोर्ट्स क्लबच्या नालासोपारा, विरार, दहिसर व बोरीवली येथे शाखा असून तेथे मुला-मुलींना नियमित कराटे प्रशिक्षण दिले जात असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

------------

हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL


 rajesh pande