अमरावती: पाळनकर खूनप्रकरणी ६ आरोपी अटकेत
हत्येनंतर दहशत माजवणारे १७ आरोपी देखील जेरबंद अमरावती,20 डिसेंबर (हिं.स.) नांदगाव पेठ पोलीस स्टेशन हद्दीत वाळकी रोड वरील बोरनदी प्रकल्पाच्या परिसरात घडलेल्या मंथन पाळनकर खूनप्रकरणी गुन्हे शाखा व नांदगाव पेठ पोलिसांनी संयुक्त कारवाई करत एकूण ६ आरो
अटक-लोगो


हत्येनंतर दहशत माजवणारे १७ आरोपी देखील जेरबंद

अमरावती,20 डिसेंबर (हिं.स.) नांदगाव पेठ पोलीस स्टेशन हद्दीत वाळकी रोड वरील बोरनदी प्रकल्पाच्या परिसरात घडलेल्या मंथन पाळनकर खूनप्रकरणी गुन्हे शाखा व नांदगाव पेठ पोलिसांनी संयुक्त कारवाई करत एकूण ६ आरोपींना अटक केली आहे. तसेच मंथन च्या हत्येनंतर राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीत तोडफोड करून दहशत माजवणाऱ्या १७ आरोपींनाही अवघ्या ५ तासांत ताब्यात घेण्यात आले आहे.पोलिसांनी तत्परतेने केलेल्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

फिर्यादी ओम रविंद्र पाळणकर (वय १६, रा. सातुर्णा, अमरावती) यांनी१९ डिसेंबर रोजी नांदगाव पेठ पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा भाऊ मंथन रविंद्र पाळणकर (वय १९) यास जुन्या वादातून आरोपींनी नांदगाव पेठ येथील बोरनदी प्रकल्प येथे बोलावून डोक्यावर, मानेवर व पाठीवर चाकूने वार करत निर्घृण हत्या केली. या प्रकरणी नांदगाव पेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक ४५०/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०३(१), १९१(२), १९१(३), १९०, ६१(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मादर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त बातमीदारांच्या सहाय्याने तपास करत खूनप्रकरणातील एकूण ६ आरोपींना ताब्यात घेतले आहे. यामध्ये संतोष पांडुरंग गाते वय २४ वर्ष रा. शितला माता मंदिर जवळ, राजापेठ, अमरावती,सुजल दिपक शर्मा वय २३ वर्ष रा. हीरा कॉलनी गोपाल नगर, अमरावती, सुजल पुरुषोत्तम जायभाये वय २८ वर्ष रा. आदर्श नगर गोपाल नगर अमरावती यांच्यासह विधी संघर्षित एक पुरुष बालक व दोन महीला बालक यांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास नांदगाव पेठ पोलीस स्टेशन करीत आहे.

दरम्यान, या हत्येच्या घटनेनंतर मृतकाच्या सहकाऱ्यांनी राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीतील केडिया नगर व शंकर नगर परिसरात लाठ्या-काठ्या घेऊन वाहनांची तोडफोड करत नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली. या प्रकरणी राजापेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर या गंभीर घटनेची दखल घेत गुन्हे शाखा व राजापेठ पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अवघ्या ५ तासांत एकूण १७ आरोपींना अटक केली असून यामध्ये अभिषेक हेमराज सुर्यवंशी वय २१ वर्ष रा. सातुर्णा अमरावती,ओम दिप बाबरी वय १८ वर्ष रा दसरा मैदान अमरावती,अजय चंद्रभान मोहोड वय १८ वर्ष रा. दसरा मैदान अमरावती,विशाल विश्वनाथ गोटेफोडे वय २६ वर्ष रा. सातुर्णा अमरावती,आयुष राहुल चर्के वय १८ वर्ष रा. वसंतराव नाईक नगर अमरावती,जय नंदु वानखडे वय १८ वर्ष रा. जोडमोड औरंगपुरा, अमरावती,गणेश उर्फ घटयां प्रकाश लांडगे वय १८ वर्ष रा जोडमोड औरंगपुरा, अमरावती, प्रेम शाम चिलखे वय २० वर्ष रा हमालपुरा अमरावती,सुरज संदानंद तायडे वय २३ वर्ष रा. वडाळी, अमरावती,अनिकेत देवानंद वरघट वय २५ वर्ष रा. गजानन नगर, बिच्छु टेकडी अमरावती,प्रेम विजय वानखडे वय २० वर्ष रा. वसंतराव नाईक नगर अमरावती यांच्यासह सहा विधी संघर्षित बालकांचा समावेश आहे.

-----------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande