
छत्रपती संभाजीनगर, 20 डिसेंबर, (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगरातील ज्योतीनगर भागातील शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मुख्य पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली आहे.
या बैठकीत आगामी महापालिका निवडणुका, संघटनात्मक बांधणी, प्रभागनिहाय आढावा तसेच स्थानिक नागरिकांच्या मूलभूत समस्यावर चर्चा करण्यात आली.
परिसरातील पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, स्वच्छता, ड्रेनेज, वीजपुरवठा आदी प्रश्नांवर पदाधिकाऱ्यांनी आपली मते मांडली. तसेच शिवसेना पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी शाखास्तरावर काम वाढवणे, नव्या कार्यकर्त्यांना जबाबदाऱ्या देणे आणि जनतेशी थेट संपर्क वाढवण्याचा यावेळी निर्धार करण्यात आला.
याप्रसंगी शिवसेना महानगरप्रमुख राजू वैद्य,गिरीश चपळगावकर,नितीन पवार, महिला आघाडी संपर्क संघटक सुनीता आऊलवार व जिल्हा संघटक आशा दातार उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis