रत्नागिरी : बाया कर्वे इन्स्टिट्यूटच्या नेल आर्ट कार्यशाळेला प्रतिसाद
रत्नागिरी, 20 डिसेंबर, (हिं. स.) : बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या नेल आर्ट कार्यशाळेला विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या विद्यार्थिनींमध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ब्युटीशियन तसेच फ्रीलान्सर ब्युटीशियन व वि
बाया कर्वे इन्स्टिट्यूटची नेल आर्ट कार्यशाळा


रत्नागिरी, 20 डिसेंबर, (हिं. स.) : बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या नेल आर्ट कार्यशाळेला विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या विद्यार्थिनींमध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ब्युटीशियन तसेच फ्रीलान्सर ब्युटीशियन व विद्यार्थी यांचाही समावेश होता. नेल आर्ट क्षेत्रातील आधुनिक ट्रेंड, तंत्रज्ञान व व्यावसायिक संधी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यशाळेदरम्यान मार्गदर्शक म्हणून ब्युटीशियन सौ. मेघा गायकवाड यांनी उपस्थितांना नेल आर्टचे विविध प्रकार, डिझाइन टेक्निक्स तसेच करिअरच्या दृष्टीने उपयुक्त माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास वाढला असून, स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा मिळाली.

या उपक्रमामुळे विद्यार्थिनींच्या कौशल्यविकासास चालना मिळाली असून भविष्यात अशा प्रकारच्या अधिक कार्यशाळा आयोजित करण्याचा मानस संस्थेतर्फे व्यक्त करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande