
नांदेड, 20 डिसेंबर (हिं.स.)। धर्माबाद नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 अंतर्गत आज दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी मतदान होत असून सदर मतदान प्रक्रिये दरम्यान प्रसारमाध्यमांकडून धर्माबाद येथील इनानी मंगल कार्यालय येथे मतदारांना कोंडले असल्याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.
सदरील बातमीच्या अनुषंगाने धर्माबाद येथील निवडणूक निर्णय अधिकारी सुरेखा स्वामी व पोलीस निरीक्षक सदाशिव बडीकर यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन तपासणी केली असून, संबंधित मंगल कार्यालय मालकावर जमावबंदी व आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबाबत फौजदारी कार्यवाही करण्यात येत असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी धर्माबाद सुरेखा स्वामी यांनी कळविले आहे,अशी माहिती नगरपालिका प्रशासनाचे जिल्हा सह आयुक्त नांदेड यांनी दिली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis